उन्हाळ्यात कॉटनची साडी नेसताना गोळा होतो? 'या' टिप्स फॉलो करून नेसा चापूनचोपून साडी
कॉटनची साडी अंगावर व्यवस्थित बसण्यासाठी साडी धुवताना स्टार्चच्या पाण्यामध्ये काहीवेळ साडी भिजत ठेवा. त्यानंतर साडी स्वच्छ पिळून कडक वळून घ्या. साडीला इस्त्री केल्यानंतर साडी अंगावर व्यवस्थित बसेल.
साडी नेसताना साडीला बाहेरून पिन न लावता साडीला आतून पिन लावावा. यामुळे साडी जास्त फुगल्यासारखी वाटत नाही. साडीच्या निऱ्यांना पिन लावताना पिन आतल्या बाजूने लावावी.
साडी नेसताना परकर घालण्याऐवजी शेप वेअर वापरावे. यामुळे साडीच्या निऱ्या व्यवस्थित बसतात. बॉडीशेपरमुळे साडी अंगावर व्यवस्थित बसते.
साडी नेसताना सिलिकॉनच्या स्टिकर्सचा वापर करावा. यामुळे साडी अंगाला चिटकून खराब होत नाही. सिलिकॉनचे स्टिकर्स बाजारात सहज उपलब्ध आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साडी नेसताना साडी शक्यतो इस्त्री करूनच नेसावी. यामुळे साडीच्या निऱ्या आणि पदर अंगावर व्यवस्थित बसतो आणि साडी सुंदर दिसते.