आजच्या काळात, खराब जीवनशैलीमुळे, लोकांना हृदयाचे ठोके, रक्तदाबात चढउतार, वजन वाढणे, पोटाचा त्रास अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी अंजीर रात्रभर दुधात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी सेवन करा. यातून तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अंजीराचे सेवन कसे करावे.
जीवनसत्त्वे, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि लोहाने समृद्ध असलेले अंजीर शरीराला अनेक फायदे प्रदान करण्यास मदत करते. तुम्हाला फक्त एक ग्लास दुधात 2-3 अंजीर टाकायचे आहेत आणि रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सेवन करायचे
हाडे- अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे अंजीरचे सेवन हाडांसाठी फआयदेशीर ठरू शकते. दूध आणि अंजीर एकत्र सेवन केल्याने हाडे कमकुवत होणार नाहीत
हृदय- अंजीरमध्ये अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण आढळेत, जे हृदय निरोगी ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात
केस-अंजीरमध्ये लोह आणि इतर पोषक घटक असतात जे केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जातात. अंजीर आणि दुधाचे सेवन केल्याने केस मजबूत होतात
प्रतिकारशक्ती- अंजीरमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. त्यामुळे दूधासोभत अंजीर चे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते
त्वचा- अंजीरमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात
पचन- पचनक्रिया उपयुक्त राहण्यासाठी तुम्ही अंजीर खाऊ शकता. कारण यामध्ये फायबर असते जे पचनासाठी चांगले मानले जाते. (टीप- वर दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही उपाय अंमलात आणण्यापूर्वी, आपण संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.)