बॉलीवूडमधील श्री कृष्णाचे खास भक्त कोण कोण आहेत ते जाणून घ्या.
हेमा मालिनी – या यादीत पहिले नाव आहे ते म्हणजे बॉलीवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी. ज्या श्रीकृष्णाच्या परम भक्त आहेत आणि अनेकदा वृंदावनलाही जातात.
ईशा देओल - हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल देखील तिच्या आईप्रमाणेच कान्हाची भक्त आहे.
सुमेध मुदगलकर – लोकप्रिय टीव्ही अभिनेता सुमेध मुदगलकर हे देखील श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्याने एका टीव्ही शोमध्येदेखील कान्हाची भूमिकाही साकारली आहे.
मल्लिका सिंग – टीव्ही अभिनेत्री मल्लिका सिंग देखील या यादीत आहे. जी एका टीव्ही शोमध्ये राधाची भूमिका साकारताना दिसली होती. अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही कान्हाची भक्त आहे.
देवोलीना भट्टाचार्जी – टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीचाही या यादीत समावेश आहे. ती कान्हाजींना आपला चांगला मित्र मानते.
अनघा भोसले - अभिनेत्री अनघा भोसले श्रीकृष्णाच्या भक्तीत इतकी तल्लीन झाली आहे की तिने अभिनयाला अभिनयालाहदेखील रामराम ठोकला आहे.
शिल्पा शेट्टी - बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही या यादीत समावेश आहे. अभिनेत्री अनेकदा कान्हाची पूजा करतानाही दिसते.