Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sweet Potato Chaat: उपवासात काहीतरी चटपटीत खायचंय? झटपट तयार करा रताळ्याची चविष्ट चाट!

Sweet Potato Chaat: नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा आणि बटाट्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर रताळ्याची चटपटीत चाट हा एक सोपा पर्याय आहे. ही चाट बनवण्यासाठी १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि घरातील सहज उपलब्ध साहित्य वापरता येते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 09, 2026 | 11:13 AM

Sweet Potato Chaat (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 6

नवरात्री काही तासांवर येऊन ठेपली आहे. या नऊ दिवसांत घरात एकदम वेगळं वातावरण राहतं. सगळीकडे देवीचा गजर, आरती आणि उपवास धरतात. नऊ दिवसांमध्ये देवीची नऊ रुपयांची पूजा केली जाते. तसेच बरेचजण उपवास पकडतात. उपवास म्हटला की नऊ दिवस चप्पल न घालणे, मीठ न खाणे आणि फक्त उपवासाचे पदार्थ खाणे असा नियम बऱ्याच घरात पाळला जातो. याकाळात साबुदाणा, बटाटा खाऊन कंटाळा येतो आणि वजन देखील वाढते.

2 / 6

मग प्रश्न पडतो की उपवासाला वेगळं आणि पोटभरीचं काय खायचं? तर त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे रताळे असते. ते शरीरासाठी सर्वात चांगले, पौष्टीक आणि भरपूर एनर्जी देणारे कंदमुळ आहे. आज आम्ही तुम्हाला रताळ्यापासून एक चटपटीत चाट कसा बनवायचा त्याची एकदम सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे बनवायला केवळ 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि साहित्य पण घरातलंच लागेल.

3 / 6

लागणारे साहित्य हे चाट बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही आणायची गरज नाही. 2-3 मध्यम आकाराचे रताळे,थोडंसं पाणी, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीपुरतं सैंधव मीठ, म्हणजे उपवासाचं मीठ, एका लिंबाचा रस, हवी असेल तर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची.

4 / 6

बनवण्याची पद्धत सगळ्यात आधी रताळी स्वच्छ धुऊन घ्या. त्यावर खूप माती असते त्यामुळे दोन-तीन पाण्याने धुवा. आता एका कुकरमध्ये किंवा पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा आणि त्यात ही रताळी उकडायला टाका. कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा.रताळी उकडल्यानंतर ती बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. गरम असताना साल काढायला जाऊ नका, हात भाजेल. थंड झाल्यावर त्याची साल काढा आणि त्याचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. खूप मोठे तुकडे करू नका, नाहीतर मसाला लागणार नाही.

5 / 6

आता एका मोठ्या भांड्यात हे तुकडे टाका. त्यावर आमचूर पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि सैंधव मीठ टाका. हे सगळं हातानेच हलकं मिक्स करा. चमच्याने जास्त घोटू नका, नाहीतर रताळ्याचा लगदा होईल. शेवटी त्यावर एका लिंबाचा रस पिळा. लिंबामुळे या चाटला एकदम चटपटीत टेस्ट येते. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची पण टाकू शकता. वरून थोडी कोथिंबीर टाकली की झालं. तुमचं गरमागरम आणि चटपटीत रताळ्याचं चाट तयार आहे.

6 / 6

हे चाट इतकं खास का आहे?हे फक्त उपवासासाठीच नाही तर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता. ज्यांना डाएट करायचं आहे त्यांच्यासाठी पण हा एक हेल्दी ऑप्शन आहे. यात तेलाचा वापर अजिबात नाही, त्यामुळे वजन वाढायची भीती नाही. लहान मुलांना पण हे आवडेल.तर या नवरात्रीत तोच तो साबुदाणा खिचडी खाण्यापेक्षा हे नवीन चाट एकदा नक्की ट्राय करून बघा. घरातल्यांना पण नक्की आवडेल.

Web Title: Sweet potato chaat recipe navratri fasting 10 minute snack rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • food news
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Cerebral palsy in Adults: प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीबाबतचे ‘हे’ 4 गैरसमज; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ते…
1

Cerebral palsy in Adults: प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीबाबतचे ‘हे’ 4 गैरसमज; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ते…

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…
2

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…

Best Fan Speed While Sleeping: झोपताना पंखा किती स्पीडवर ठेवावा? ‘ही’ चूक केल्यास झोप होण्याऐवजी होईल त्रास
3

Best Fan Speed While Sleeping: झोपताना पंखा किती स्पीडवर ठेवावा? ‘ही’ चूक केल्यास झोप होण्याऐवजी होईल त्रास

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
4

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.