साऊथ इंडियन स्टाईलमधील 'गुट्टापुसालू' हाराच्या मनमोहक डिझाईन्स
दाक्षिणात्य संस्कृतीतील 'गुट्टापुसालू' हा एक रॉयल आणि पारंपरिक दागिना आहे. 'गुट्टा' म्हणजे थवा आणि 'पुसालू' म्हणजे मणी किंवा मोती. नाजूक मोत्यांचा वापर करून बनवलेला सुंदर हार कोणत्याही साडीवर उठावदार दिसेल.
साध्या साडीला राजेशाही आणि रॉयल लुक देण्यासाठी तुम्ही गुट्टापुसालू दागिन्याची निवड करू शकता. हल्ली अनेक सेलिब्रिटींनीही या दागिन्याला पसंती खूप जास्त पसंती दिली आहे.
गुट्टापुसालू हारातील डिझाईन पाहून तुम्हीसुद्धा दागिन्यांच्या प्रेमात पडाल. हा हार प्रामुख्याने कांजिवरम किंवा पैठणी साडीवर सुंदर दिसतो. नाजूक नक्षीकाम आणि रंगीत मण्यांचा वापर करून बनवलेला सुंदर दागिना सगळ्यांचं खूप जास्त आवडतो.
लक्ष्मी किंवा देवीदेवतांच्या कोरीव नक्षीकामासोबत मोत्याच्या मण्यांनी सजवलेला सुंदर हार लेहेंग्यावर सुद्धा घालू शकता. दक्षिण भारतात दागिन्यांना विशेष महत्व आहे.
तुम्हाला जर जास्त जड किंवा हेवी दागिने नको असतील, तर तुम्ही नाजूक साजूक हाराची निवड करू शकता. फॉर्मल साड्या किंवा सिल्क ड्रेसवर या डिझाईनचा नेकलेस उठावदार दिसेल.