समुद्रापासून तयार झालाय पृथ्वीवरील ग्रेट हिमालय पर्वत! कोट्यवधी वर्षांपूर्वी नक्की असं काय घडलं?
हिमालय ही आशिया खंडात पसरलेली जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, 4.70 कोटी वर्षांपूर्वी भारतीय व युरेशियन प्लेटस एकमेकांवर आदळल्यानंतर हिमालयाची निर्मिती झाली
आधी हिमालय पर्वतच्या जागी टेथीस नावाचा समुद्र होता. टेथीसच्या तळावरील गाळाच्या खडकांवर पडलेल्या दाबामुळे तो भाग उंचावत गेला
एका स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात प्लँक्टनचे (समुद्रात तरंगणारे जीव) रुपांतर एका चिकट पदार्थांमध्ये झाले, ज्यामुळे खडक एकमेकांना चिकटून विशालकाय पर्वत उभे राहिले
यातूनच हिमालय पर्वताचीही निर्मिती झाली. हिमालय पर्वत रांगेत 15 हजाराहून जास्त हिमनद्या आहेत