मेहंदी समारंभात नवरीवर उठून दिसतील 'या' प्रकारचे सुंदर कानातले
कस्टमाईज कानातल्यांची किंमत साधारणता २०० ते ५०० रुपये पर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या डिझाइन्सचे कानातले तयार करून घेऊ शकता.
मेहेंदी, हळद, संगीत इत्यादी सोहळ्यांमध्ये नवरीच्या कानात कस्टमाईज कानातले आणि दागिने असतात. त्यामुळे तुम्ही या सर्व सोहळ्यांसाठी या पद्धतीचे सुंदर आणि युनिक दागिने तयार करून घेऊ शकता.
कस्टमाईज कानातले किंवा दागिने फक्त नावरीसाठीच नाहीतर घरातील इतर महिलांसाठी सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता.
हल्ली मेहंदी सोहळ्यात हिरव्या रंगाचे कानातले घालण्याऐवजी नवरीच्या कानात वेगवेगळ्या रंगाचे कानातले असतात. वेगवेगळे रंग कानात खूप उठावदार दिसतात.
कस्टमाईज कानातल्यांमध्ये तुम्हाला जर हेवी डिझाईन हवी असेल तर तुम्ही या पद्धतीचे कानातले तयार करून घेऊ शकता. कानात घातल्यानंतर खूप सुंदर लुक येईल.