टीम इंडिया : आज भारताचा संघ T-20 वर्ल्ड कपआधी (T-20 World Cup 2024) बांग्लादेशशी सामना खेळणार आहे. आज हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8.00 वाजता सुरु होणार आहे. भारताचा संघ बांग्लादेशविरुद्ध हा एकमेव सामना खेळणार आहे. 2 जूनपासून T-20 वर्ल्ड कप 2024 ची सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध ५ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या T-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे ५ नवीन खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहेत. भारताच्या 15 सदस्यीय संघात अशी 5 नावे दिसली ज्यांची प्रथमच T-20 विश्वचषकासाठी निवड झाली. त्यात स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांचाही समावेश आहे.
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालने कसोटी आणि T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. तो भारतीय संघासाठी मुख्य सलामीवीर बनला आहे. (फोटो सौजन्य – BCCI X अकाउंट)
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज काही काळापासून भारतीय संघाचा भाग आहे. परंतु T-20 वर्ल्ड कपमध्ये निवड होण्यासाठी त्याला 2024 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकातही सिराज टीम इंडियाचा एक भाग होता. (फोटो सौजन्य – BCCI X अकाउंट)
अष्टपैलू शिवम दुबेने IPL 2024 च्या सुरुवातीच्या टप्प्यात उत्कृष्ट फलंदाजी केली होती. दुबेची पहिल्यांदाच T20 विश्वचषकासाठी निवड झाली आहे. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे सोपे जाणार नाही. (फोटो सौजन्य – BCCI X अकाउंट)
कुलदीप यादव दीर्घ काळापासून टीम इंडियाचा भाग आहे आणि तिन्ही फॉरमॅट खेळतो. पण, 2024 मध्ये पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कपमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. (फोटो सौजन्य – BCCI X अकाउंट)
पहिल्या T-20 विश्वचषकाचा भाग होण्यासाठी संजूला जवळपास 9 वर्षे लागली. संजूने नुकत्याच झालेल्या आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली होती, ज्यामुळे त्याचा T-20 विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. (फोटो सौजन्य – संजू सॅमसन इंस्टाग्राम अकाउंट)