वाढत्या उन्हाळ्यात लहान मुलांच्या आरोग्यसाठी गुणकारी ठरतील 'हे' पदार्थ
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात काकडी, कलिंगड, खरबूज इत्यादी अनेक फळे उपलब्ध असतात. या फळांचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते.
उष्णता वाढल्यानंतर आहारात पाण्यासोबतच लिंबूपाणी सुद्धा प्यावे. लिंबू पाणी प्यायल्यामुळे थकवा, अशक्तपणा दूर होतो. याशिवाय यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते.
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स लहान मुलांची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मुलांना आहारात वाटीभर दही खाण्यास द्यावे. यामध्ये असलेल्या प्रथिने आणि कॅल्शियममुळे हाडे मजबूत राहतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मुलांना नियमित नारळ पाणी पिण्यास द्यावे. यामुळे शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढण्यास मदत होईल. नारळ पाणी शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे.
ताक पिणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि फायद्याचे आहे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.