नोकरी करणाऱ्या महिलांच्या मेकअप पाऊचमध्ये कायम असायला हव्यात 'या' गोष्टी
घाईगडबडीमध्ये फाउंडेशन लावणे खूप कठीण वाटते. अशावेळी तुम्ही कोणत्याही चांगल्या ब्रॅण्डची बीबी क्रीम त्वचेला लावू शकता. त्यामुळे तुमच्या मेकअप पाऊचमध्ये हायड्रेटिंग बीबी क्रीम असणे आवश्यक आहे.
काही मिनिटांमध्ये चेहऱ्यावर सुंदर चमक आणण्यासाठी तुम्ही न्यूड किंवा गुलाबी रंगाचा ब्लश वापरू शकता. त्यामुळे तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही पावडर ब्लश वापरू शकता आणि जर तुमची त्वचा ड्राय असेल तर तुम्ही क्रीम ब्लश वापरू शकता.
मेकअप करताना लागणारे महत्वाचे प्रॉडक्ट म्हणजे मस्कारा. यामुळे पापण्या जाड आणि लांब दिसू लागतात. तसेच डोळ्यांचे सौंदर्य वाढण्यास मदत होते.
ऑफिससाठी केल्या जाणाऱ्या सिंपल लुकसाठी तूम्ही आय लाइनरचा वापर करावा. काळ्या रंगाचे आय लाइनर डोळ्यांवर अतिशय सुंदर दिसते.
ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी सर्वच महिला ओठांना शोभेल अशा रंगाची सुंदर लिपस्टिक लावतात. लिपस्टिक म्हणजे महिलांच्या जिव्हाळयाचा विषय. त्यामुळे तुम्ही ऑफिससाठी, रोजच्या वापरासाठी न्यूड किंवा गुलाबी रंगाचे हलके शेड्स निवडू शकता.