खिशात ठेवा या गोष्टी, भूतापासून रहा लांब. (फोटो सौजन्य - Social Media)
तुम्हाला माहीत आहे का? अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपल्या खिशात ठेवल्या किंवा जवळ असल्या तर या नकारात्मक गोष्टी आपल्यापासून दूर राहतात. त्या गोष्टी कोणत्या? पाहुयात.
मीठ हे नकारत्मक उर्जेला आपल्या पासून लांब ठेवतं असे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्यात मीठमोहऱ्याची नजर काढली जाते. मीठ शुद्ध वस्तू आहे आणि नकारात्मक ऊर्जा/भुतांना दूर ठेवते.
लोखंड असो वा धातू, खिशात ठेवून फिरलात तर नकारत्मक ऊर्जा जवळ येत नाही असे पूर्वीचे लोकं म्हणत. पोलिसांच्या बेल्टमध्येदेखील पाच धातूंचा वापर केलेला असतो त्यामुळे त्यांनाही वर्दीत असा काही त्रास जाणवत नाही.
कापूर आणि धूपदेखील सकारात्मक उर्जेला आकर्षित करतं. घरासमोर रांगोळीही याच कारणामुळे काढली जाते, असे लोकांचे म्हणणे आहे.
या गोष्टी लोककथेवर आधारित असून आम्ही याचा दावा करत नाही.