भारताचं एक असं शहर, ज्याला केवळ एका दिवसासाठी बनवलं होतं देशाची राजधानी
इतिहासात असं देखील झालं होतं, जेव्हा भारताच्या एका शहराला केवळ एका दिवसासाठी देशाची राजधानी बनवण्यात आलं होतं. ही घटना 1858 मध्ये घडली होती. सध्या भारताची राजधानी दिल्ली आहे. मात्र त्यापूर्वी देशाची राजधानी कोलकाता होती.
जेव्हा भारताची राजधानी कोलकाता होती, तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात सरकारचे कामकाज शिमला शहरातून सुरु होतं. त्यामुळे अशावेळी देशाची राजधानी शिमला मानली जात होती.
तुम्हाला माहिती आहे का की भारतात असे एक शहर आहे जे फक्त एका दिवसासाठी देशाची राजधानी बनवले गेले होते?
रिपोर्ट्सनुसार, 1858 मध्ये अलाहाबाद शहराला एका दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आलं होतं. असे म्हटले जाते की या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीने शहरातील ब्रिटिश राजेशाहीकडे देशाचे प्रशासन सोपवले.
भारताच्या राजकीय इतिहासात ही ऐतिहासिक घटना विशेष मानली जाते. 1858 मध्ये जेव्हा अलाहाबादला एका दिवसासाठी राजधानी बनवण्यात आले तेव्हा ते त्यावेळी उत्तर भारतातील मुख्य शहर होते.