'हा' आहे जगातील सगळ्यात खतरनाक मासा! एकाच वेळी घेऊ शकतो ३० पेक्षा जास्त लोकांचा जीव, वाचा सविस्तर
जगातील सगळ्यात खतरनाक माशाचे नाव पफर फिश आहे. हा मासा जगभरात सगळ्यात खतरनाक आणि विषारी मानला जातो. दिसायला सुंदर असणारा मासा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी कणा असलेला मासा मानला जातो.
पफर फिश एकाच वेळी ३० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेऊ शकतो. या माशामध्ये खूप जास्त विष असते. त्यामुळे कायमच पफर फिशपासून चार हात लांब राहण्याचा सल्ला दिला जातो.
पफर फिशच्या शरीरात 'टेट्रोडोटॉक्सिन' नावाचे विष असते, जे सायनाइडपेक्षा 1200 पटीने खूप जास्त घातक असते. त्यामुळे हा मासा एकाच वेळी अनेक लोकांचे जीव घेऊ शकतो.
या माशाची सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे पफर फिशच्या विषावर अद्याप कोणतेही किंवा उतारा आला आहे. त्यामुळे मानवासाठी हा मासा जीवघेणा ठरतो.
समुद्रात ज्यावेळी पफर माशाला धोका जाणवतो तेव्हा तो स्वतःच्या शरीरात पाणी किंवा हवा भरून घेतो ज्यामुळे माशाचा आकार मोठ्या चेंडूसारखा दिसतो.