महाप्रलयनंतरही पृथ्वीवरील हे ठिकाण राहील सुरक्षित; कारण असं की विश्वास ठेवावाच लागेल...
पृथ्वीवर प्रलय कधी आणि कसा आला याविषयी वेगवेगळी भाकित करण्यात आली आहेत. हा प्रलय आलाच तर सर्वकाही नष्ट होईल
प्रलय आलाच तर त्यात सर्व गोष्टी नष्ट होऊन जातील, काहीही शिल्ल्क राहणार नाही. शिवपुराणासह अनेक धर्मग्रथांमध्ये त्याचा उल्लेख आहे.
या धर्मग्रथातच प्रलयातही भगवान शिवाची नगरी काशी कशी सुरक्षित राहिल ते सांगण्यात आले आहे. काशिला भगवान शिवाची नगरी म्हटले जाते
काशिमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी नववे ज्योतिर्लिंग आहे. इथे भगवान शंकर काशी विश्वनाथाच्या रुपात विराजमान आहेत. या जागेविषयी अशी श्रद्धा आहे की, महाप्रलयानंतरही हे ठिकाण सुरक्षित राहिल
याचे प्रमुख कारण म्हणजे, काशी शहर हे भगवान शिवाच्या त्रिशूळावर आहे आणि ज्या ठिकाणाी ज्योतिर्लिंग स्थापन करण्यात आलं आहे ते कधीही नाहीसे होणार नाही
धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा प्रलय येईल तेव्हा भगवान शिव आपल्या त्रिशूळाने काशीला उचलतील आणि प्रलयाच्या पाण्यापासून वाचवतील. स्थानिकांचा असा विश्वास आहे की, वेळ आलीच तर भगवान शंकर स्वतःच त्यांच्या नगरीचे रक्षण करतील