वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहील चंदेरी साडीचे सौंदर्य! 'अशी' घ्या साडीची काळजी
चंदेरी साडी मऊ पोत, हलकी चमक आणि चंदेरी जरीसाठी ओळखली जाते. पण चुकीच्या पद्धतीने साडी ठेवल्यास ती लगेच फाटून जाते. त्यामुळे साडी कधीच घरी धुवू नये.
साडीवरील एम्ब्रॉयडरीचा रंग खराब होऊन नये म्हणून साडी ड्राय क्लिंग करावी. यामुळे साडीवरील नक्षीकाम आणि जरी अजिबात खराब होत नाही. जरी असलेल्या साड्या कायमच थंड पाण्याने धुवाव्यात.
चंदेरी सिल्क साडी कधीही थेट सूर्यप्रकाशात सुकवू नये. यामुळे साडीची चमक कमी होऊन जाते. साडीला कोणताही डाग लागल्यानंतर संपूर्ण साडी धुवण्याऐवजी स्पॉट क्लीनिंग करावे.
साडीला शक्यतो घरात इस्त्री करू नये. यामुळे साडी जळू शकते. त्यामुळे साडीला इस्त्री करताना कायमच टू मीडियम हीटचा वापर करावा, ज्यामुळे साडीला कोणतीही हानी पोहचणार नाही.
चंदेरी साडी कायमच सुती बॅगमध्ये भरून ठेवावी. बॉक्स किंवा कोणत्याही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साडी भरून ठेवू नये. हे उपाय केल्यास वर्षानुवर्षे साडी नव्यासारखी व्यवस्थित टिकून राहील.