मराठमोळ्या नऊवारी साडीवर शोभून दिसतील 'या' पारंपरिक सुंदर डिझाईनच्या नथ
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिलांच्या नाकात तुम्ही नथ दागिना पहिला असेल. पांढरे मोती आणि सोन्याच्या तारीचे गुंफण करून बनवलेली नथ नाकाची शोभा वाढवते. तसेच तुम्ही सोन्याच्या मण्यांचा वापर करून बनवलेली नथ सुद्धा खरेदी करू शकता.
काठपदर नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर पेशवाई किंवा मोठ्या आकाराची पारंपरिक नथ परिधान केल्यास तुम्हाला लुक मराठमोळा आणि उठावदार दिसेल. पूर्वीच्या काळी महिला नाकात आकाराने मोठ्या असलेल्या नथ परिधान करत होत्या.
काहींना नाकात अतिशय नाजूक साजूक डिझाईनची नथ घालायला खूप जास्त आवडते. त्यामुळे तुम्ही मोत्याची किंवा कारवारी पद्धतीच्या नथीची निवड नऊवारी साडीवर घालण्यासाठी करू शकता.
हेवी काठ आणि गडद रंगाची नऊवारी किंवा सहावारी साडी नेसल्यास या डिझाईनची नथ नाकात घालू शकता. मणी, मोती आणि डायमंडचा वापर करून या डिझाईन्सच्या नथ हाताने बनवल्या जातात.
हल्ली नावाच्या नथींचा मोठा ट्रेंड आहे. प्रत्येक महिलेच्या दागिन्यांमध्ये एक तरी नवऱ्याचे नाव लिहून तयार केलेला नथ ही असतेच.अर्धगोलाकार नथीवर सुंदर पद्धतीने नवऱ्याचे नाव टाकून नथ बनवली जाते.