पांढऱ्या शुभ्र साडीवर शोभून दिसतील 'या' रंगाचे आकर्षक ब्लाऊज, नेहमीपेक्षा दिसेल हटके लुक
प्रत्येक महिलेच्या कपाटात वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज असतात. त्यातील लाल रंग अतिशय कॉमन आहे. डिझायनर लाल रंगाचा ब्लाऊज असेल तर तो तुम्ही कॉटनच्या पांढऱ्या साडीवर मॅच करू शकता.
पांढऱ्या रंगाच्या साडीवर सर्वच महिलांना प्रामुख्याने गुलाबी रंगाचे ब्लाऊज घालतात. पण कायमच डार्क गुलाबी रंगाचे ब्लाऊज घालण्याऐवजी फिकट गुलाबी रंगाच्या ब्लाऊजची निवड करावी.
कायमच कॉटनची साडी नेसण्याऐवजी सॅटिन किंवा शिफॉन फॅब्रिकमधील पांढऱ्या रंगाची साडी नेसावी. या लुकमध्ये तुम्ही उठावदार आणि सुंदर दिसाल.
अनेकांना कलरफुल किंवा कॉटनचा प्रिंटेट ब्लाऊज घालायला खूप जास्त आवडते. कॉटनच्या ब्लाऊजमध्ये खूप जास्त आरामदायी वाटते. कॉटनचे रंगीत ब्लाऊज कोणत्याही साडीवर शोभून दिसतात.
कांजीवरम पांढऱ्या रंगाची साडी खरेदी करताना त्याच्या काठाला असलेल्या रंगांनुसार ब्लाऊजची निवड करावी. यामुळे लुक थोडासा पारंपरिक आणि मॉर्डन दिसतो.