महाराष्ट्रात भुतांचे अनेक भयंकर प्रकार आहेत. ठिकठिकाणी यांचे सावट असते. भुतालाही जाती असतात. काही जाती फार भयंकर मानल्या जातात. या जाती कोणत्या? जाणून घ्या.
महाराष्ट्रातील भुतांचे प्रकार. (फोटो सौजन्य - Social Media)

साती आसरा : साती आसरा या पाणी, विहीर तसेच डोहाजवळ राहणाऱ्या सात जलदेवता आहेत. या रहस्यमयी असून त्यांचे ठिकाणी पाणी किंवा पाण्याची किनार आहे.

हडळ : जेव्हा स्त्री प्रसूतीदरम्यान असते, तेव्हा जर तिचा मृत्यू झाला तर त्या आत्म्याला हडळ म्हणून ओळखलं जातं.

खवीस : अकाली मृत्यू किंवा एखाद्या व्यक्तीला हिंसक वृत्तीने मारण्यात आले तर सूडाच्या भावनेने परतलेल्या आत्म्याला खवीस म्हणतात.

समंध : जर एखाद्याची इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा अपूर्ण विधींमुळे भटकणाऱ्या आत्म्याला समंध म्हंटले जाते.

देवचार : तळ कोकणात शेतांचे किंवा गावाचे रक्षण करण्यासाठी असणारे राखणदार!






