साडीवर शिवा 'या' डिझाईनचे युनिक पॅटन ब्लाऊज
कॉटनच्या किंवा काढापदराच्या सिल्क साड्यांवर तुम्ही वी नेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता. वी नेक ब्लाऊज कॉटनच्या साडीवर अतिशय सुंदर दिसते.
पैठणी किंवा हेवी लुक देणाऱ्या साडीवर तुम्ही या पद्धतीचे आरी वर्क करून ब्लाऊज शिवू शकता. यामुळे चारचौघांमध्ये तुमचा लुक उठावदार आणि सुंदर दिसेल.
काहींना उघड्या गळ्याचे ब्लाऊज घालायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही बोटनेक किंवा या डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. यामध्ये तुमचा लुक स्टायलिश दिसेल.
ऑर्गेंजा किंवा शिफॉन साड्यांवर या पद्धतीचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. काहींना खूप जास्त स्टायलिश आणि फॅशनेबल राहायला आवडते. त्यामुळे कोणत्याही साडीवर या डिझाईनचे ब्लाऊज सुंदर दिसेल.
डिझायनर किंवा इतर कोणत्याही साडीवर तुम्ही मोठ्या गळ्याचे ब्लाऊज शिवून ब्लाऊजच्या काठाला आरी वर्क किंवा लेस लावून घेऊ शकता.