लग्नसमारंभात परिधान करा 'या' साऊथ स्टाईल साड्या
मैसूर सिल्क साडी कॉस्ट्रास्ट बॉर्डर आणि लाईट वेट असलेली सुंदर साडी आहे. ही साडी तुम्ही सणावाराच्या दिवशी किंवा इतर कार्यक्रमांमध्ये सुद्धा नेसू शकता.
चेट्टीनाड साडी, धर्मावरम साडी, कोनराड साडी, गडवाल साड्या सुद्धा साऊथ इंडियन पर्टनमध्ये येतात.
साऊथ इंडियन साड्या अनेक वेगवेगळ्या कापडाचा वापर करून तयार केली जाते. शिवाय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साडीचा काठ तयार करण्यासाठी देऊ शकता.
साऊथ इंडियन किंवा तामिळ लग्नामध्ये नवरीला प्रामुख्याने पांढऱ्या रंगाची कसावू साडी नेसण्यास दिली जाते. या साडीवर कोणत्याही रंगाचा ब्लॉऊज अतिशय सुंदर दिसतो. तुम्हीसुद्धा लग्नात या पद्धतीची साडी नेसू शकता.
तेलंगणामध्ये प्रसिद्ध असलेली पोचमपल्ली साडी सर्वच महिलांना नेसण्यास आवडते. कॉटन आणि सिल्क अशा दोन्ही फॅब्रिकमध्ये ही साडी उपलब्ध आहे.