Sleeping Position Of Husband Wife: वास्त्रुशास्त्रात प्रत्येक गोष्टीला महत्त्व असतं. यामध्ये अगदी नवरा आणि बायकोने एकमेकांच्या कोणत्या बाजूला झोपावं याबाबातही नियम सांगण्यात आलेले आहेत. यामुळे नवरा - बायकोचे वैवाहिक जीवन अधिक सुखकर होते आणि याशिवाय घरातील सुख-समृद्धी वाढण्यासदेखील मदत मिळते असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रज्ञ दीपक भागवत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य - iStock)
वास्तुशास्त्रानुसार पती आणि पत्नीने नेमकं कोणत्या बाजूला झोपावे, ज्यामुळे त्यांच्यात खटके उडणार नाहीत आणि सुखाचा संसार होईल हे जाणून घेऊया
वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीची खोली दक्षिण दिशेला असावी. तसंच बेड हा लाकडाचा असावा आणि चांगल्या स्थितीत असावा. तुटलेल्या पलंगावर कधीही झोपू नका
तसंच नवरा आणि बायको ज्या खोलीत झोपणार आहेत त्या खोलीला हलके रंग वापरा. गडद रंगाचा वापर या ठिकाणी करू नका
वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपावे. पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपणे शुभ असते. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. तसेच समृद्धी वाढते
जर पत्नी पतीच्या डाव्या बाजूला झोपली तर पतीचे नशीबसुद्धा साथ देते. पती दीर्घायुषी राहतो आणि त्यांची प्रकृतीही चांगली राहते, याशिवाय संपत्ती वाढते
पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिवाने अर्धनारेश्वराचे रूप धारण केले तेव्हा त्यांच्या डाव्या शरीरातून स्त्री तत्व म्हणजेच माता पार्वती प्रकट झाली. म्हणूनच हिंदू धर्मात पत्नीला वामांगी अर्थात डाव्या अंगाचा अधिकार म्हटले आहे
यामुळेच प्रत्येक शुभ कार्यात पत्नी पतीच्या डाव्या बाजूला बसते. लग्नातही वधूला वराच्या डाव्या बाजूला बसवले जाते. यामुळे पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपावे
पती-पत्नीने झोपताना हे वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवले तर दोघांचेही आयुष्य आनंदी राहते आणि ते वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात