खालापूर तालुक्यातील पाली फाटा येथे रुग्णालय उभारण्याचा आराखडा दोन वर्षांपूर्वी तयार झाला आणि भूमिपूजनही पार पडले. मात्र प्रशासनातील विलंब आणि जमिनीच्या वादामुळे हे काम ठप्प झाले असून स्थानिकांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.रुग्णालयाची गरज पाली फाटा हे पाली रोड, पेण रोड आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे मिळणारे महत्त्वाचे ठिकाण आहे.या मार्गांवर वारंवार अपघात होत असल्याने तातडीच्या उपचारांसाठी येथे रुग्णालय असणे काळाची गरज मानली जाते.देवन्हावेचे तत्कालीन सरपंच रवींद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीची काही एकर जागा रुग्णालयासाठी आरक्षित केली.आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन निधीतून रुग्णालयाचे काम मंजूर झाले. मात्र अद्याप याचं काम पूर्ण न झाल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.