एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका (फोटो- फोटो सौजन्य-X)
एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका
शेतकऱ्यांना मदत करणार – एकनाथ शिंदे
जिथे संकट तिथे शिवसेना
Dasara Melava Live 2025: आज मुंबईच्या गोरेगाव येथे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे नेमके आपल्या भाषणार काय म्हणाले, ते जाणून घेऊयात.
दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधकांना मदत म्हणउण दिलेल्या वस्तू दिसत नाहीत. हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांच्या बाजूला बसतात.” एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे म्हणाले, “यांचे हिंदुत्व कॉँग्रेसच्या दावणीला बसले तेव्हा संपले.”
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्रीपदासाठी , खुर्चीसाठी सगळे घालवले. पक्षाचा प्रमुख पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? ह्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. गटप्रमुख नव्हे तर कटप्रमुख. शिवसैनिकच माझी संपत्ती आहे. यांना लोक सोडून गेले याचे आत्मपरीक्षण करणार की नाही? स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना संपवणारा अध्यक्ष जगात कुठे झाला नसेल.”
शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत करणार – शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, “बळीराजा संकटात आहे. आपला बळीराजा संकटात आहे. आपत्ती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना, बळिराजाला मदत करण्यासाठी तुम्ही तिकडेच थांबा असे मी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना सांगितले. शेतकरी संकटात आहे. पशुधन वाहून गेले आहे. घरांची पडझड झाली आहे. मी स्वतः त्यांचे दु:ख पहिले आहे. आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. अनेक शिवसैनिक मदत करत आहेत. मदत पोहोचते आहे. जिथे संकट , जिथे आपत्ती तिथे शिवसेना. जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशीवे राहणार नाही. एकनाथ शिंदे समाजकारणाचे व्रत सोडणार नाही.”
“शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार हा माझ्या शब्द आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकरी बांधवानो धीर सोडू नका. टोकाचे पाऊल उचलू नका. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे.”
Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही. वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा एकनाथ शिंदे नाही. आपत्ती असताना घरात बसणार शिवसैनिक असूच शकत नाही. संकटात कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात दिसला पाहिजे.”