उंच इमारती या काचेच्याच का असतात? फार रंजक आहे यामागचं कारण
अनेकांना असे वाटते की, इमारतींना सुंदर बनवण्यासाठी असे केले जाते, मात्र यामागचे कारण फक्त हे नाही तर याचे मूळ कारण म्हणजे यामुळे विजेची बचत होते.
काच ही पारदर्शक असते, ज्यामुळे इमारतीत सूर्यप्रकाशही प्रवेश करु शकतो. यामुळे दिवसा लाईट्सची गरज भासत नाही.
काचेच्या या इमारती अशाप्रकारे बनवल्या जातात की त्या, जोरदार वारा, भूकंप किंवा इतर दाबांनाही सहज तोंड देऊ शकतात. या इमारती कोणत्याही हवामानाचा सामना करु शकतात आणि ओलाव्यामुळे खराब होण्याची काळजीही यात नसते
इमारती काचेच्या असल्या की त्या आगीपासून सुरक्षित राहू शकतात. अशा इमारतींचे आगीमुळे फारसे नुकसान होत नाही. शिवाय आग लागलीच तर अशा इमारतींमधून पटकन बाहेर पडता येते
शिवाय काचेच्या इमारतींना धूळ आणि घाण फारशी जमा होत नाही. काचेच्या इमारतींना स्वच्छ करण्यासाठीही कमी खर्च लागतो आणि त्यांना दुरुस्तीची देखील आवश्यकता नसते