फोटो सौजन्य: @CMOMaharashtra (X.com)
अखेर, भारतीय ऑटो बाजारात टेस्ला मॉडेल वाय लाँच झाली आहे. ही इलेक्ट्रिक कार Rear-wheel Drive आणि Long Range Rear-wheel Drive अशा दोन व्हेरिएंटमध्ये लाँच झाली आहे. तसेच, या कारची अधिकृत विक्री सुद्धा सुरु झाली आहे.
टेस्लाने भारतात या इलेक्ट्रिक एसयूव्हीची ऑन-रोड किंमत ₹61.07 लाख ठेवली आहे, तर टॉप मॉडेलची किंमत ₹69.15 लाख आहे. ही कार दिल्ली, गुरुग्राम आणि मुंबई या प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे.
मात्र, अमेरिकेत टेस्ला मॉडेल वायची किंमत ही $44,990 म्हणजेच 38 लाख रुपये. तेच हीच किंमत भारतात 60 लाखांपेक्षा जास्त आहे. असे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारतात पूर्णतः परदेशात बनवलेल्या कार्सवर सुमारे ७० टक्क्यांपर्यंत कर लागतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लॉजिस्टिक्स खर्च, कारण ही कार चीनमधील शांघाय प्लांटमधून मुंबईपर्यंत आणली जाते. यासोबतच वाहतूक, कस्टम्स आणि इतर प्रक्रिया यांमुळेही एकूण खर्चात मोठी वाढ होते.
टेस्ला मॉडेल Y एकाच कॉन्फिगरेशन पर्यायासह येणार आहे. मॉडेल Y RWD व्हेरिएंटची रेंज 500 किमी पर्यंत असेल. तसेच, मॉडेल Y लाँग रेंज रीअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटची रेंज 622 किमी पर्यंत असेल.