भारतीय रेल्वेमध्ये महिलांना मिळतात 'या' खास सुविधा, तुम्हाला माहिती आहेत का?
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार 60 वर्षांवरील महिलांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी तिकीटामध्ये 50% सवलत दिली जाते
रेल्वेमध्ये महिलांसाठी काही जागा आरक्षित असतात. गर्दीच्या वेळेस महिला या सुविधेचा फायदा घेत सुरक्षित प्रवास करू शकतात
रेल्वेच्या नियमानुसार, कोणत्याही महिलेकडे तिकीट नसेल किंवा ते हरवले असेल तर टीटीई त्या महिलेला ट्रेनमधून बाहेर काढू शकत नाही
यासोबतच कोणत्याही महिलेचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना लोअर बर्थचे तिकीट दिले जाते, ज्यामुळे महिलेला आरामात प्रवास करता यावा
एखादी महिला प्रेग्नंट असेल तर ती महिला तपासणी कर्मचाऱ्यांना विचारुन त्यांची मधली किंवा वरची सीट खालच्या बर्थसाठी बदलू शकतात
लोकल किंवा ट्रेनमध्ये महिलांसाठी वेगळा डब्बा दिला जाते, ज्यात फक्त महिलाच प्रवास करु शकतात