आपण रोज अनेक पदार्थ हेल्दी आहेत आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत असं समजून त्याचे सेवन करत असतो. मात्र त्यापैकी असे काही पदार्थ आहेत जे खरं तर अनहेल्दी असून त्रासदायक ठरतात
लोक अनेकदा फळांचा रस आरोग्यदायी मानून त्यांच्या नाश्त्यात समाविष्ट करतात. पण पॅकेज्ड ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. ताज्या फळांमध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक फायबरचाही अभाव आहे. हे तुमच्या आरोग्यासाठी कमी फायदेशीर आणि अधिक हानिकारक असू शकते
लोक डाएट सोडा हेल्दी मानतात कारण त्यात कॅलरीज कमी असतात. मात्र त्यात कृत्रिम गोड पदार्थांचा समावेश असतो. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. तसंच तुमची चयापचय क्रिया मंदावते आणि वजनही वाढू शकते
लोक एनर्जी बारला हेल्दी स्नॅक मानतात, पण त्यात साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जही जास्त असतात. हे त्वरीत ऊर्जा प्रदान करते, परंतु दीर्घकाळापर्यंत ते आपल्या शरीरातील चरबी वाढवू शकते
दही हे आरोग्यदायी मानले जाते, परंतु फ्लेवर्ड योगर्टमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यासोबतच कृत्रिम फ्लेवर्सदेखील आहेत जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. यापेक्षा साधे दही खाणे उत्तम ठरते
ग्रॅनोला एक हेल्दी स्नॅक म्हणून खाल्ले जाते. मात्र त्यात साखर आणि मध देखील जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. ते कमी प्रमाणात खाणे चांगले ठरते