जगातील सर्वात महागडी वेब सिरीज! एक एपिसोड तब्बल 500 कोटींचा, संपूर्ण बजेट ऐकून हादराल...
ही एक टीव्ही सिरीज आहे आहे, जिचे नाव द लॉर्ड ऑफ रिंग्स: रिंग्स ऑफ पॉवर असे आहे. या सिरीजने इतिहास रचला. याचा पहिला सीजन 2022 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आला
Collider च्या रिपोर्टनुसार, या वेब सीरिजच्या प्रोडक्शनसाठी तब्ब्ल 3800 कोटींचा खर्च आला होता. या सिरीजचे 8 एपिसोड असून प्रत्येक एपिसोडसाठी 480 कोटी रुपयांचा खर्च आला होता
'द रिंग्ज ऑफ पॉवर'चा दुसरा सीझनही 2024 मध्ये ओटीटीवर रिलीज झाला. याची फार चर्चा देखील झाली. भारतीय चित्रपटांशी याची तुलना केली तर, याच्या एका एपिसोडची किंमत चित्रपटापेक्षाही जास्त आहे
महागड्या चित्रपटांबद्दल बोलणं केलं तर यात कल्की 2898AD, RRR आणि आदिपुरुष असे चित्रपट सामील आहेत. यांचे बजेट 70 ते 75 दशलक्ष डॉलर्स इतके आहे, जे 'द रिंग्ज ऑफ पॉवर' सीरिजच्या किमतीच्या 1/15 वा हिस्सा आहे
द रिंग्ज ऑफ पॉवर ही एक काल्पनिक टेलिव्हिजन मालिका आहे. एका कांदंबरीवर आधारित ही मालिका आहे, ज्यात हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट दाखवण्यात आली आहे