Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एक कुत्रं लय पिसाळलंय!” जैन मुनी निलेशचंद्रांवर ठाकरेंच्या शिलेदाराचा घणाघात; वादग्रस्त पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा

राम मंदिर दानपेटीतील कथित चोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर टीका करणाऱ्या जैन मुनी निलेशचंद्र यांना अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरून कडवे प्रत्युत्तर दिले. त्यांच्या पोस्टमुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 19, 2026 | 07:46 PM
'एक कुत्रं लय पिसाळलंय!" जैन मुनी निलेशचंद्रांवर ठाकरेंच्या शिलेदाराचा घणाघात

'एक कुत्रं लय पिसाळलंय!" जैन मुनी निलेशचंद्रांवर ठाकरेंच्या शिलेदाराचा घणाघात

Follow Us
Follow Us:
  • राम मंदिर प्रकरणावरून ठाकरे गट आणि जैन मुनी आमनेसामने
  • अखिल चित्रेंची निलेशचंद्रांवर सोशल मीडियातून तीव्र टीका
  • वादग्रस्त पोस्टमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले
 

अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाची भूमिका घेतली असून, विविध ठिकाणी रामरक्षा आंदोलन आयोजित केले जात आहे. या आंदोलनावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जैन मुनी निलेशचंद्र यांनी आपल्या वक्तव्यात उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी राम मंदिरातील चोरीचा मुद्दा मंदिर प्रशासन हाताळेल असे सांगत, ठाकरे यांनी या विषयावर राजकारण करू नये, अशी भूमिका मांडली होती. तसेच त्यांच्या आंदोलनावरही उपरोधिक टिप्पणी केली होती.

नेमकं काय म्हणाली अखिल चित्रे?

या वक्तव्याला उत्तर देताना अखिल चित्रे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत निलेशचंद्र यांच्यावर टीका केली. राम मंदिरातील कथित चोरीच्या वेळी मौन बाळगणारे लोक आता आवाज उठवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संबंधित प्रकरणातील दोषींना संरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा त्यांनी केला.

‘मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून ते म्हणाले, “ज्या कुत्र्यांनी चढावा चोरी होत असताना भुंकायला पाहिजे होतं, ते आता चोरी पकडल्यानंतर का भुंकत आहेत? याचा अर्थ इतकाच की, चढावा चोरीत फक्त ट्रस्टीच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणारी काही कुत्रीही सहभागी होती. त्यातलं एक कुत्रं मुंबईत “निलेशचंद्र” या नावाने मोकाट फिरत आहे. पवित्र धर्माच्या आड लपून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. लय पिसाळलंय!”

ज्या कुत्र्यांनी चढावा चोरी होत असताना भुंकायला पाहिजे होतं, ते आता चोरी पकडल्यानंतर का भुंकत आहेत?
याचा अर्थ इतकाच की, चढावा चोरीत फक्त ट्रस्टीच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणारी काही कुत्रीही सहभागी होती. त्यातलं एक कुत्रं मुंबईत “निलेशचंद्र” या नावाने मोकाट फिरत आहे. पवित्र… pic.twitter.com/ux0ZCXpxUB
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) July 18, 2026

“@mybmc , याचा फोटो पाठवत आहे. वेळीच याच्या मुसक्या आवळा. #पिसाळलेला_निलेशचंद्र आणि हो… राम मंदिरासाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या शिवसैनिकांचीच आम्ही लेकरं आहोत. आम्ही राम मंदिरातील दरोडेखोरीविरुद्ध आवाज उठवत आहोत. त्या आवाजाचा त्रास त्यांनाच होतोय, ज्यांना या दरोडेखोरीला पाठीशी घालायचं आहे.”

मुंबई महापालिकेला टॅग करत कारवाई करण्याची मागणी

चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेलाही टॅग करत निलेशचंद्र यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी संघर्ष केला असून मंदिरातील कथित गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

Aaditya Thackeray: ‘आम्हाला कापले तरी भाजपसमोर…’, आदित्य ठाकरेंचे मुंबईत जाहीर आंदोलन; थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, राम मंदिर दानपेटी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील आक्रमक पोस्ट आणि परस्परांवरील टीकेमुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणावर संबंधितांकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Akhil chitre slams jain muni nileshchandra over ram mandir row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.