Pune Railway Station News: पुणे रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कऱण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. या आरोपांप्रकरणी पुण्यात वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन छेडण्यात आले असून वसंत मोरेंनी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. असे असतानाही प्रत्यक्षात मात्र स्टेशन परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे अथवा कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा निधी नेमका वापरला गेला, त्या निधीचं नेमकं काय झालं, असा प्रश्नही वसंत मोरेंनी उपस्थित केला आहे.
या आरोपामुळे रेल्वे प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा खरोखरच कार्यरत आहे की नाही, यावर शंका व्यक्त केली जात आहे. वसंत मोरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत यात भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी १०० कोटींचे बजेट देण्यात आले होते. पण गेल्या दोन वर्षांत रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे पाहायला मिळत नाही. असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे.
Cabinet Meeting : शेतकरी कर्ज ते पायाभूत सुविधा, मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे सर्वांत मोठे 5 निर्णय
पुणे रेल्वे स्टेशनच्या सुरक्षा व्यवस्था अत्यंत खालावली असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ एकदाही स्टेशन परिसरात फिरकलेले दिसत नाहीत. मोहोळ हे फक्त विमानतळावर जातात आणि तिकडचीच व्यवस्था पाहतात. पण सर्वसामान्य माणूस ज्या रेल्वेने दररोज प्रवास करतो. त्या रेल्वेच्या स्टेशन परिसरात ते गेल्या एक वर्षात ते एकदाही फिरकलेले नाहीत त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही आढावा घेतला नाही.
“खासदार मोहोळ यांनी गेल्या वर्षभरात केवळ विमानतळालाच भेट दिली असून, त्याच्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली आहे. मात्र, पुणे रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वेळ देण्याची त्यांना गरज वाटत नाही,” असा आरोप मोरे यांनी केला. तसेच, पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कुचकामी झाली आहे. सुरक्षेसाठी लावलेली उपकरणे बिघडलेली आहेत, सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे, आणि मेटल डिटेक्टरसारख्या मशीन्स देखील कार्यरत नाहीत.”याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
साडीचा सुंदर काठ लावून शिवा ‘या’ डिझाइन्सचे आकर्षक ब्लाऊज, चारचौघांमध्ये दिसेल हटके आणि
“मोहोळ लोकसभेत उभे राहून देवाची उरळी येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याच्या घोषणा करतात. मात्र, सध्याचे पुणे रेल्वे स्टेशन सुरक्षित कसे करणार याबाबत मात्र मौन बाळगतात.” असा टोलाही त्यांनी लगावला आहे. विशेष म्हणजे, पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु, या निधीचा नेमका वापर कसा आणि कुठे झाला याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. त्यामुळे या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका शिवसेनेने ठेवला असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यात यावा, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.