नवीन सदैव विकत घेतल्यानंतर त्यावर नेमका ब्लाऊज कसा शिवावा? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी कोणत्याही कार्यक्रमात महिला सुंदर साडी नेसून छान तयार होता. बऱ्याचदा काठपदर साडी खरेदी केल्यानंतर साडीच्या ब्लाऊजला मोठा काठ असतो. हा काठ काही महिला वापरतात, तर काही महिला काठाचा वापर न करता ब्लाऊज शिवून घेतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला साडीच्या काठाचा वापर करून ब्लाऊज शिवण्याच्या काही आकर्षक आणि सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्सचे ब्लाऊज शिवून घेतल्यानंतर तुम्ही चारचौघांमध्ये सुंदर आणि स्टयलिश दिसाल. (फोटो सौजन्य – पिंटरेस्ट )
साडीचा सुंदर काठ लावून शिवा 'या' डिझाइन्सचे आकर्षक ब्लाऊज
साडीला असलेला सुंदर आणि बारीक काठाचा वापर तुम्ही ब्लाऊजच्या हातांसाठी करू शकता. या प्रकारे साध्या ब्लाऊजला साडीचा काठ लावल्यास ब्लाऊज आणखीनच उठावदार दिसेल.
पैठणी किंवा काठापदराच्या साड्यांना मोठे काठ असतात. त्यामुळे या काठांचा वापर करून तुम्ही आरी वर्क केलेले सुंदर ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
काही साड्यांचे काठ अतिशय मोठे असतात. त्यांचा वापर तुम्ही ब्लाऊजच्या मागील गळ्याला करू शकता. बाह्यांच्या ऐवजी मागील गळ्याला केलेली डिझाईन अतिशय उठावदार दिसेल.
अनेक महिलांना बोटनेक असलेले ब्लाऊज घालायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही खण किंवा कॉटनच्या साडीचा काठ वापरू या डिझाईनचा ब्लाऊज शिवू शकता.
तुमच्या साडीला जर मध्यम आकाराचा काठ असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी वापरू शकता. चौकोनी किंवा गोलाकार आकारात शिवलेला ब्लाऊज सुंदर दिसेल.