Anjali Damania again criticizes Dhananjay Munde over Lives in government residence in Mumbai
Anjali Damania Marathi News : मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावरुन काढलेल्या सूरज चव्हाण यांना पुन्हा एकदा पक्षामध्ये पद देण्यात आले आहे. यावरुन राष्ट्रवादीवर चौफेर टीका होत आहे. समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या निर्णयावर अंजली दमानिया यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मला असं वाटतं की, ज्या पक्षाने 23 दिवसांपूर्वी त्यांच्यावर कारवाई केली होती आणि का आता त्यांनी अतिशय चुकीचं वर्तन केलं जे न शोभणारं होतं, असं सांगून ज्यांच्यावर कारवाई केली त्या सूरज चव्हाण यांना युवक अध्यक्षपदावरण सरचिटणीस पद जर मिळालं तर अजित पवारांच्या शब्दांवर आता लोक विश्वास कसा ठेवणार? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “अजित पवार आताच म्हणजे तीन आठवड्यापूर्वी जे म्हणतात की, त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही करतोय आणि पदावर घेतात गंमतच आहे. म्हणजे यांच्या शब्दावर आता याच्यापुढे विश्वास ठेवायचे की नाही. राष्ट्रवादीत सगळ्यांवरच गुन्हे आहेत सगळ्यांवरच आरोप आहेत सगळ्यांवरच गुंडागर्दीचे आरोप आहेत. देवेंद्र फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणायचे की, त्यांना सिंचन घोटाळा चक्की पिसिंग अँड पिसिंग,” असे म्हणत अंजली दमानिया यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील शासकीय बंगला सोडलेला नाही. यावरुन मुंडेंवर टीका केली जात आहे. यावरुन अंजली दमानिया यांनी देखील निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की,”धनंजय मुंडे यांच्याबद्दल म्हणाल्या की, एक तर मला असं वाटतं धनंजय मुंडे जेव्हा आधी म्हणाले ते धादांत खोटं बोलले आधी म्हणाले की, माझे मुंबईत घर नाही म्हणून मला सातपुडा बंगल्यात राहायचं. मला आजारपण आहे आणि त्याच्यात मुंबई त्यांचं घर आहे त्यांना आजारपण नाही. फक्त चार आठवड्यांपुरताच तो प्रॉब्लेम असतो तो केल्यानंतर बरा होतो. धनंजय मुंडे खोटं बोलतात इतका ड्रामा करतात, मला तर वाटतं त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला पाहिजे ड्रामॅटिकमध्ये,” अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.