Bhaskar Jadhav news: “ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. आज मी जे बोलतोय, त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही,” अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघावर हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. त्यातच सोमवारी मुंबईत पार पडलेले्या मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण संघाचे गुहागर तालुकाध्यक्ष धनशाम जोशी यांना बेडकाची उपमा देत चांगलीच आगपाखड केली. इतकेच नव्हे तर परिणांची चिंता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
भास्कर जाधव म्हणाले, मला पराभूत कऱण्यासाठी तालुक्यातील बौद्ध समाजाला माझ्या विरोधात भडकावलं. वंचित आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला, त्यातही माझे नाव घेण्यात आले. ठाण्यातील त्या नेत्यालाही मी सोडणार नाही. घनशाम जोशींनी पक्ष म्हणून पत्र लिहायला पाहिजे होतं. पण त्यांनी समाज म्हणून पत्र लिहीलं याचं वाईट वाटलं माझ्याविरोधात जिल्ह्यात पत्र द्या नाहीतर राज्यात द्या, मी ते गटारात फेकून देतो. अशा शब्दांत जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच, लढाई कितीही मोठी होऊ द्या माझी राजकीय कारकीर्द संपली तरी चालेल पण माझ्या आईविषयी अपशब्द वापरणाऱ्यांना मी सोडणार नाही, तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीत मी केसेस अंगावर घेतल्या. पण माझ्या आईला शिव्या दिल्या जात असताना विनय नातू टाळ्या वाजवत होते. समोरासमोर ते माझ्याशी दोन हात करू शकणार नाहीत. म्हणून माझी बदनामा करून माझे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. पण गुहागरमधील कुणबी समाजालाही माझा सावधानतेचा इशारा आहे, मी बाजूला झालो की त्यांनी तुम्हालाही गिळून टाकलचं म्हणून समजात. उद्या तुमच्या घरात पुजा सांगायला कुणी आले नाही तर घाबरू नका, मी पूजा सांगायला येईल, पण हे लोक स्वत: च्या घरात पुजा घालतात का तेही आधी विचारा, असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला.
गुहागरमध्ये जर संघर्ष त्यांनी सुरू केला आहे. पण भास्कर जाधव कुणालाही घाबरणारा नाही. त्यांचं कुणबी समाजावर प्रेम नाही ते समजून घ्या, सर्वात मोठा समाज असलेल्या कुणबी समाजाचे रामभाऊ बेंडल एकदाच कसे निवडून आले, याचाही विचार करा, समाजाचे नेतृत्त्व संपवण्यासाठी त्यांनी समाजात तेढ निर्माण केले. समाजात तेढ निर्माण करणारे हे अनाजीपंत आहेत. मी २० गावाहून अधिक गावचा दस्त भरणारा मी खोत आहे. सावध व्हा, हा शेवटचा वार आहे. पण भास्कर जाधव असा सहज मागे हटणारा माणूस नाही.
Ronaldo engaged : अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय
माझी त्या दिवशीची सभा राजकीय होती. त्या व्यासपीठावर मी दोन-चार कार्यकर्त्यांबद्दल बोललो. ते विशिष्ट समाजाचे असतील, तर तो मुद्दा संपूर्ण समाजावर गेल्याचे चित्र उभे करण्यात आले. मी तीन-चार भाजप कार्यकर्त्यांची नावे घेतली आणि त्यानंतर ब्राह्मण समाजाच्या तालुका अध्यक्षांनी माझ्याविरोधात निषेधाचे पत्र लिहिले.एक क्लिप माझ्या पाहण्यात आली, ज्यामध्ये म्हटले होते, “भास्करराव, ब्राह्मण समाज जागा झाला तर तुम्हाला अवघड होईल.” म्हणजे, निवडणूक आली की काही जणांना जाती दिसतात आणि दुसऱ्या समाजाबद्दल बोलण्याची संधी शोधतात. त्यांना वाटत होते, या निवडणुकीत मला हरवता येईल, भास्कर जाधव घाबरेल. पण भास्कर जाधव वाघाची अवलाद आहे — मी लढणार आहे, सहजासहजी गुडघे टेकणार नाही. एक शब्द न बोलता माझ्याविरोधात निषेधाचे पत्र काढले जाते, मग मराठा समाज मेलाय का? महाराष्ट्रात कोणाला पैसा कमी पडू शकतो, पण विकासासाठी भास्कर जाधव एक रुपयाही कमी पडू देणार नाही, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
भाषणात जाधव म्हणाले, “मला आज तुमच्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मी जर आता बोललो नाही तर भविष्यात काळ अडचणीचा ठरू शकतो. माझी निवडणूक नुकतीच झाली आहे, त्यामुळे चार वर्षे मला काही अडचण नाही. अनेक जण मला सोडून गेले, काहींनी माझा फायदा घेतला, पण मी काही बोललो नाही. यामुळे त्यांना वाटू लागले की हा काहीच करू शकत नाही. मात्र, आतापर्यंत मी गप्प बसलो होतो, पण आता मी कोणालाही सोडणार नाही.”