Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander News : महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’; शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका

नुकताच पदभार स्वीकारलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांच्या पहिल्याच अधिकृत पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 12, 2026 | 02:28 PM
Bhayander News : महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’; शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका
Follow Us
Close
Follow Us:
  • महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’;
  • शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका
भाईंदर/ विजय काते : नुकताच पदभार स्वीकारलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांच्या पहिल्याच अधिकृत पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रशासनाला दिलेल्या सूचना पत्रकात मराठी भाषेतील शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळून आल्याने समाजमाध्यमांवर याची जोरदार चर्चा रंगली असून विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची नुकतीच निवड झाली. बुधवारी त्यांनी महापालिका मुख्यालयात पदभार स्वीकारला. मेहता या अमराठी असल्याने त्यांच्या निवडीवर मराठी एकीकरण समितीने सुरुवातीपासून आक्षेप घेतला होता. “मराठी महापौर द्या” या मागणीसाठी समितीने आंदोलनही छेडले होते. मात्र सत्ताधारी भाजपने आपल्या निर्णयावर ठाम भूमिका घेतल्याने हे आंदोलन कालांतराने थंडावले.

दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर महापौरांनी महापालिका आयुक्तांना शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना देणारे पत्र पाठवले. मात्र हेच पत्र आता चर्चेचा विषय ठरले आहे. पत्रामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी शब्दरचना चुकीची असून इंग्रजी शब्दांचा अधिक वापर करण्यात आल्याचेही दिसून येते. परिणामी, समाजमाध्यमांवर हे पत्र व्हायरल झाले असून नागरिकांकडून टिका व टिंगलटवाळी सुरू आहे.

Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया

मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “पदभार स्वीकारताच महापौरांनी मराठीची गळचेपी सुरू केली आहे. प्रशासनातील अधिकृत पत्रव्यवहारात अशा प्रकारच्या चुका असणे ही गंभीर बाब आहे,” असे म्हटले आहे. तसेच महापालिकेच्या कारभारात मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महापौर डिंपल मेहता यांनी सांगितले की, संबंधित पत्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून तयार करण्यात आले होते.

“पत्रात काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्याची शहानिशा करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्याच्या आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या वादावर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढे काय घडामोडी होतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Ratnagiri News : चिपळूणच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ; दोन बड्या नेत्यांची अनपेक्षित भेट

Web Title: Bhayander news opposition criticizes mayor dimple mehta for marathi spelling mistakes in her letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.