BJP Chandrashekhar Bawankule on target Pakistan over Pahalgam terror attack
अमरावती : जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला झाल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशातून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. तसेच पाकिस्तान विरोधात कडक पाऊले उचलण्याची देखील मागणी केली जात आहे. भारताकडून सिंधू जल करारला स्थगिती देण्यात आली आहे. तर पाकिस्तानने शिमला करार मोडित काढला आहे. यामुळे देशांच्या सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानबाबत आक्रमक भूमिका घेणार आहेत, असे मत राज्यातील भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीव व्यक्त केले आहे.
पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले, “जर भारताने आमचा पाणी पुरवठा थांबवला, तर आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत,आमच्याकडे गौरी, शाहीन, गजनवी आणि १३० अण्वस्त्रे आहेत आणि ती सर्व फक्त भारतासाठीच राखून ठेवली आहेत, असा इशारा पाकिस्तानच्या मंत्र्यांनी दिला आहे. यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. बावनकुळे म्हणाले की, “जो गरजते है…वो बरसते नहीं..पाकिस्तान फक्त गरजत आहे.पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी कमजोर आहे. अनेक लोकांना तिथे जेवण मिळत नाही. तो देश काय दुष्मनी करणार आहे? काय युद्ध करणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी कडक पावलं उचलेले आहे,” असे मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याच्या नावाखाली देशातील जनतेला मूर्ख बनवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांना विनंती करतो की अशा वेळी कोणतेही राजकीय वक्तव्य करू नका. देशातील राज्यातील राजकारणी लोकांनी अशावेळी मोदींच्या पाठीशी राहले पाहिजे. असे वक्तव्य करून भारताच्या जनतेला डी-मोर्निग करू नये,” अशा शब्दांत बावनकुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
भारताचे जलद प्रत्युत्तर, सिंधू करार रद्द अन् पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हकालपट्टी
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने तत्काळ आणि ठाम कारवाई करत सिंधू नदी पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. याचबरोबर, दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्ताननेही प्रत्युत्तर देताना भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आणि शिमला करार अधिकृतपणे रद्द केला. या पावलांनी संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्रात युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्याचे जाणवते.