BJP Chandrashekhar Bawankule target mp sanjay raut over PM Narendra Modi Retirement
नागपूर : मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेत आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 75 ची शाल अंगावर आल्यानंतर दुसऱ्यांकडे नेतृत्व सोपवावे असे सूचक विधान केले होते. यावरुन खासदार संजय राऊत यांनी आरएसएस पंतप्रधान मोदी यांना निवृत्तीची आठवण करुन देत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावरुन आता भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. सध्या सुरु असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवर देखील बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कोकाटे यांनी स्वतः भूमिका व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल चौकशीनंतर सर्व समोर येईल असे मत व्यक्त केले होते. आता कोकाटे स्वतः त्या संदर्भात बोलले आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणे योग्य ठरणार नाही,” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी घणाघात केला आहे. ते म्हणाले की, “संजय राऊत यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, हे सर्वांना माहिती आहे. ते कमी बोलले असते तर उद्धव ठाकरे यांच्या जागा वाढल्या असत्या. त्यांच्या बोलण्याने उद्धव ठाकरे यांच्या जागा कमी होतात. मोदी यांना 2029 पर्यंत जनमत मिळाला आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षात कोणाला नेता मानायचे हे ठरवावे. मात्र भाजप आणि आमच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये लुडबुड करण्याचा त्यांना अधिकार नाही. मोदी समर्थ आहे, सक्षम आहे. यापूर्वी अनेकांनी 81 – 82 वयापर्यंत काम केले आहे. संजय राऊत यांना पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल ईर्ष्या होत आहे, कारण त्यांना माहिती आहे त्यांचं दुकान मोदींमुळे बंद झालं आहे,” असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “ह्या सर्व शिळ्या भाकऱ्या आहे. मीडियामध्ये आपल अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते वाढवून बोलत आहे. 2025 चे बोला. 2018, 19, 22 मध्ये काय घडलं ते काय सांगता. आत्ताचे मुद्दे काढा. विरोधी पक्षाचे काम आहे, महाराष्ट्राच्या विकासाकरिता चार गोष्टी मुख्यमंत्र्यांना सांगावे. आज मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विरोधकांना महाराष्ट्रासाठी काही गोष्टी सांगता आल्या असत्या,” असे देखील मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
पक्षनेता कोण होईल यावरुन तिघेही आपापसात भांडतात
विधीमंडळाचे नुकतेच पावसाळी अधिवेशन पार पडले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला आहे.त्याचबरोबर विधानसभेचे देखील विरोधी पक्षनेते रिक्त आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरु असल्याचे दिसत आहे. याबाबत टीका करताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये प्रचंड वाद आहे, अधिवेशनाच्या शेवट ची पत्रकार परिषद ही ते एकत्रित करू शकले नाही. वेगवेगळी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यावरून समजून जा की विरोधी पक्षनेता कोण होईल तिघेही आपापसात भांडत आहेत,” असा टोला भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.