Pankaja Munde Dasara Melava 2025 Bhagwan Baba Gad Live
Pankaja Munde Dasara Melava Live : बीड : विजयादशमीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात मेळावे सुरु आहेत.अनेक राजकीय नेते विचारांचे सोने लुटत असून समर्थकांना संबोधित करत आहेत. भगवानबाबा गडावर या वर्षी देखील भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली ही परंपरा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी सुरु ठेवली आहे. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करत भाषण केले. यावेळी त्यांनी सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे असल्याचे स्पष्ट केले.
पंकजा मुंडे भाषणाच्या सुरुवातीला म्हणाल्या की, माझ्या या दसरा मेळाव्यामध्ये संपूर्ण राज्यातून लोक आली आहेत. दरवर्षी येतात. भगवान बाबा यांनी सुरु केलेले हे सीमोल्लंघन हे अतिवृष्टीच्या वेळेतही यशस्वी करुन दाखवलं. सीमोल्लंघन ही एक परंपरा आहे. हा फक्त मेळावा नाही तर अत्यंत डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या, कष्ट करणाऱ्या आणि ऊसतोड कामगार म्हणून कष्ट करणाऱ्या सर्व फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे. मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते की, एवढा पूर आलेला असताना आणि गावागावांमध्ये पाणी शिरलेले असताना लोकांचे संसार वाहून गेलेले असताना देखील एवढ्या अडचणींमध्ये तुम्ही एवढ्या लांब आला आहात. सर्व महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून लोकं आली आहेत, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. तसेच त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिल्या.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला. आता हा मेळावाही तुम्ही हिरावून घेताय असं वाटतं. तुम्ही शुद्धीवर नाही. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही माझी माणसं नाहीत. गोंधळ घालणाऱ्यांनी कितीही माझ्या नावाच्या घोषणा दिल्या तरी तुम्ही पवित्र होणार नाही. कारण अशी बेशिस्त मी यापूर्वी मेळाव्यात पाहिली नव्हती, असे त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना बजावलं. तर लोकांचं दुख पाहून वेदना झाल्या. मी शब्दात मांडू शकत नाही. मोदी आणि फडणवीस यांच्यावतीने शब्द देतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत. पूर्ण मदत करणार आहोत, असं आश्वासन त्यांनी दिलं.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री पंकजा मुंडे यांनी शेर देखील म्हटला. त्या म्हणाल्या की, विरासत में अगर संघर्ष मिला है..तो जिद भी मिली हैं लढने की…चाहे जो भी हो, दटकर आगे बढने की..बदलू खूद कौ मैं कू,विचारोंको की अटल चोटी हूं..मैं गोपीनाथ मुंडें की बेटी हूं…! अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी भर भाषणामध्ये शेर म्हटला. पुढे त्या म्हणाल्या की, नव दिवस आमच्या घरात कांदा लसूण नाही. नॉनव्हेज नाही. नऊ दिवस आम्ही देवीची पूजा केली. या देवींनी महिषासुर, रक्तबिजासारखा राक्षस संपवून टाकला आहे हे सांगताना त्यांनी आज रक्तबीजासारखा राक्षस जन्माला आलाय. तुमच्या मेंदूत जन्माला आला. चुकीच्या निर्णयातून, संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात. जातीचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. तर देवीला प्रार्थना करते हे राक्षस नष्ट करण्याची शक्ती दे, असे पंकजा मुंडे या त्यांच्या भगवान बाबा गडावरील भाषणामध्ये म्हटल्या आहेत.