ठाणे: अंबरनाथमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध आर्थोपेडिक डॉक्टरच्या विरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला ही डोंबिवली येथील रहिवासी आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केले असल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या पतीची मृत्यू झाली असून त्यांच्या उपचारादरम्यान पीडितेची आणि डॉक्टरची ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत डॉक्टरने तिला लग्नाचे आमिष दाखवत सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप आहे. या घटनेने अंबरनाथ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
तासगाव पाेलिसांची मोठी कारवाई; बेकायदा दारू साठ्यावर छापा टाकला अन्…
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक डॉक्टरचे वय ५२ असून तो मुंबईतील रुग्णालयासोबत ठाण्यातील एका रुग्णालयात मानद सेवा देखील देतो. पीडित महिला ही देखभाल व दुरुस्तीचे काम करते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती हृदयरोगाने ग्रस्त होता. तसेच त्यांच्या पायाला गँगरीन झालं होतं. यामुळे त्यांनी ठाण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात आपल्या पतीला उपचारासाठी दाखल केलं होतं. यावेळी तेथील डॉक्टरने पतीचे पाय गुडघ्यापासून खाली कापावे लागतील, असं सांगितलं. यासंदर्भातची यशस्वी शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ज्ञ असलेल्या आरोपी डॉक्टरने केली. त्यानंतर या डॉक्टरशी महिलेचा पतीच्या रुग्ण सेवेच्या माध्यमातून संबंध आला. पतीचे औषधोपचार, काही मार्गदर्शनासाठी पीडित महिलेने संपर्क केला की संबंधित डॉक्टर पीडित महिलेच्या डोंबिवलीतील घरी येऊन पतीला तपासून निघून जात होते. पतीची तब्येत खालावल्याने २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले.
मुलांना मार्गदर्शन करायचे
त्यानंतर संबंधित डॉक्टर आपल्या तब्येतेची नियमित विचारपूस करायचे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलाला घरी येऊन दोन ते तीन तास मार्गदर्शन करायचे. त्या निमित्ताने घरी चहा, जेवण सोबत व्हायचे. आपला मुलगा बाहेरगावी शिक्षण घेत आहे याची माहिती डॉक्टरांना होती. एक दिवस मी घरी एकटी असताना डॉक्टरांनी काही बोलायचे आहे असे बोलून ‘माझ तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत राहायचे आहे. माझे आणि पत्नीचे पटत नाही. मी लवकरच तिला घटस्फोट देणार आहे’ असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्याशी आपल्या मनाविरूध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार करत राहिले असे फिर्यादीत नमूद आहे असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
पत्नीला माहिती होताच…
त्यांनतर या संबंधाची भनक डॉक्टरच्या पत्नीला लागली आण तेव्हा त्याने पीडितेला फोन करून “माझी चूक झाली, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही” असे सांगितले. त्यानंतर पीडित महिलेनं मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे ठाणे आणि मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.