Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पदवीधर निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’; आयात उमेदवाराचा डाव फसला

हर्षदा देशमुख-जाधव यांना शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि महाविकास आघाडीच्या समन्वयाचा फायदा झाला. प्रभाकर देशमुख यांच्या कन्या म्हणून त्यांचे पुणे, सातारा आणि सांगली परिसरातील संपर्कही महत्त्वाचे ठरले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 30, 2026 | 09:55 AM
पदवीधर निवडणुकीत भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम'; आयात उमेदवाराचा डाव फसला

पदवीधर निवडणुकीत भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम'; आयात उमेदवाराचा डाव फसला

Follow Us
Follow Us:
  • पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही.
  • २०२० मध्ये गमावलेला पुणे पदवीधर मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले.
  • भाजपने कोल्हापुरातील प्रभावशाली जाधव घराण्यातील स्मिता जाधव यांना ऐनवेळी पक्षात प्रवेश दिला.

पुणे : सत्ता, संघटन, प्रभावशाली राजकीय घराण्याचा पाठिंबा आणि विजयासाठी पणाला लावलेली ताकद तरीही पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. २०२० मध्ये गमावलेला मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने कोल्हापुरातील प्रभावशाली जाधव घराण्याच्या स्मिता जाधव यांना ऐनवेळी पक्षात घेऊन उमेदवारी दिली. मात्र, या धक्कातंत्राचा अपेक्षित परिणाम झाला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवत भाजपच्या रणनीतीला धक्का दिला. पदवीधर निवडणुकीच्या निकालाने एकाच वेळी उमेदवार निवडीचे राजकारण, अंतर्गत नाराजी आणि संघटनात्मक ताकदीची चर्चा सुरू केली आहे. प्रभावशाली आडनाव आणि सत्तेची ताकद असूनही भाजपचे गणित कुठे चुकले, हाच या निकालातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजपला विरोधकांनी हरवले की स्वतःच्या रणनीतीतील त्रुटींनी पराभवाचा मार्ग मोकळा केला? या प्रश्नाचे उत्तरच आगामी निवडणुकांसाठी पक्षाची दिशा ठरवणार आहे.

उमेदवारीत नाराजीची ठिणगी?

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत विस्तारलेल्या मतदारसंघात ४७ उमेदवार रिंगणात होते. मात्र, मुख्य लढत स्मिता जाधव आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात झाली. विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड आणि अजित पवार गटाचे नेते भैय्या माने हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. अखेर स्मिता जाधव यांना संधी मिळाल्याने स्थानिक इच्छुकांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली का, हा प्रश्न उपस्थित झाला.

भैय्या माने यांची नंतर माघार

भैय्या माने यांनी अपक्ष अर्ज दाखल करून नंतर माघार घेतली होती. या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या समर्थकांनी प्रचारात किती सक्रिय सहभाग घेतला, याचे उत्तर भाजपच्या आत्मपरीक्षणातूनच मिळू शकते.

नात्यांपेक्षा राजकीय गणित वरचढ

स्मिता जाधव यांचे काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याशी नातेसंबंध असल्याने कोल्हापुरातील राजकीय समीकरणांचा फायदा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळत हर्षदा देशमुख जाधव यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. त्यामुळे वैयक्तिक संबंधांपेक्षा राजकीय बांधिलकी वरचढ ठरल्याचे चित्र दिसले. त्याचवेळी बाहेरून आलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिल्यामुळे भाजपच्या पारंपरिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

मतविभाजनाचा भाजपला फायदा नाही

हर्षदा देशमुख-जाधव यांना शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि महाविकास आघाडीच्या समन्वयाचा फायदा झाला. प्रभाकर देशमुख यांच्या कन्या म्हणून त्यांचे पुणे, सातारा आणि सांगली परिसरातील संपर्कही महत्त्वाचे ठरले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुनील मोदी रिंगणात असूनही मतविभाजनाचा भाजपला अपेक्षित फायदा झाला नाही.

FAQ

प्र.1. कोणत्या मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आहे?

उ. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आहे.

प्र.2. भाजपला निवडणुकीत अपेक्षित यश का मिळाले नाही?

उ. प्रभावशाली घराण्याचा पाठिंबा आणि संघटनात्मक ताकद असूनही भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही.

प्र.3. भाजपने कोणाला उमेदवारी दिली होती?

उ. भाजपने कोल्हापुरातील जाधव घराण्यातील स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली होती.

Web Title: Bjp strategy not useful in graduate constituency election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • BJP Candidate
  • Maharashtra Govenment
  • Maharashtra Legislative Council Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.