Mumbai Politics: गेल्या आठड्यातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मराठी अस्मिता मेळाव्यानंतर संभाव्य राजकीय युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या युती झाल्यास राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीशी संबंधित मुद्द्यावर सखोल चर्चा झाल्याचे साग दोघांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा वरळीत मोठा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले असले तरी राज ठाकरे यांनी मात्र कोणतीही थेट घोषणा न करता उद्धव ठाकरेंसोबत सहकार्याचे स्पष्ट संकेत दिल आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास राज्यतील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत. मुंबई महापालिका ही केवळ महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेचे बजेट हजारो कोटींचे असल्याने ती महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास ती भाजप आणि शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते, महायुतीला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
असीम मुनीर राष्ट्रपती होणार? पाकिस्तान सरकारचा सत्तापालटाच्या अफवांवर धक्कादायक खुलासा
दरम्यान भाजपने ठाकरें बंधुच्या संभाव्य युतीच्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी एका खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणांचा अहवाल अमित शाहांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. यामुळे राज्य सरकारने महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा पर्याय निवडल्याच्याही चर्चा सुरु आहेत. त्यासाठी तांत्रिक अडचणींच्या माध्यमातून वेळ घेण्याची चर्चाही झाल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय महापालिका निवडणुका होईपर्यंत भाजप शिंदे गट किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्याने वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत, असा सप्ष्ट सल्लाही अमित शांहांनी दिला आहे. शिंदे गटातील काही नेत्यांच्या अलीकडच्या वादग्रस्त व्यक्त्व्यांमुळे आणि कृतींमुळे नवे वाद निर्माण झाले होते. भाजपनेही या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. तसेच महायुतीतील एकसंधतेचा संदेश जनतेपर्यंत पोहचवण्याचे आदेशही त्यांनी दिलेय
दरम्यान, राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्रिभाषा धोरणाच्या निर्यामुळे राज ठाकरे प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी या धोरणाला खुला विरोधही दर्शवला. यावरून शिंदे सरकारने त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला. पण त्यात ते अपयशी ठरले. याशिवाय केंद्रातील भाजप नेतृत्तव त्रिभाषा धोरण आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरूनही चिंतेत असल्याची माहिती आहे.
Public security bill: जनसुरक्षा विधेयकाचा नेमका उद्देश काय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
याशिवाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली तर भाजप-शिंदे गटाला कोणत्या नेत्यांशी, पक्षांशी किंवा प्रादेशिक गटांशी युती करता येऊ शकते याचाही विचार करत आहे. हिंदी भाषिक मतदारांचा कल, मराठी अस्मितेवर आधारित प्रचार, तसेच राजकीय संधींचा प्रभावी उपयोग कसा करता येईल, याचा अभ्यास अमित शहा यांनी केला असल्याची माहिती मिळते. हे हालचाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठरू शकतात.
मुंबईत अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्लीला रवाना झाले. त्यांनी तिथे केंद्रातील अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यातच अनेक महत्त्वाची विधेयके विधानसभेत सादर होणार असतानाही शिंदे यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आणि काही ठिकाणी उदय सामंत किंवा अन्य नेत्यांना पाठवले. या दौऱ्यादरम्यान सुनील प्रभूंंसह ५० हून अधिक नेत्यांची भेट शिंदेंनी घेतल्याचेही समोर आले आहे. या घडामोडींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे आणि संभाव्य युती, नाराजी आणि पुन्हा नव्याने घडणाऱ्या समीकरणांबाबत तर्कवितर्क रंगू लागले आहेत.