चिपळूणमध्ये महाविकास आघाडी प्रचार फेरीचा शुभारंभ; विजयासाठी कालभैरवाच्या चरणी साकडं
चिपळूण/ संतोष सावर्डेकर : चिपळूण शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला. चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थानला श्रीफळ अर्पण करुन वियज मिळावा यासाठी साकडं घालण्यात आलं आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते बहुसंख्येने उपस्थित होते. सोमवारी ही प्रचारफेरी सुरू होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस प्रशांत यादव यांना उमेदवारी मिळाली आहे. याचपार्श्वभूमीवर यादव यांनी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चिपळूण ग्रामीण भागातील गाव भेट दौरा करत मतदारांशी संवाद साधला आहे. या दौऱ्याला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाऊबीजेच्या दिवशी शहरातील प्रचार दौऱ्याचा शुभारंभ चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थानला श्रीफळ अर्पण करून केला आहे. प्रशांत यादव, माजी आमदार ,शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख आदी मंंडळी उपस्थित होती.
या प्रचार रॅली दरम्यान पत्रकारांशी बोलताना माजी आमदार रमेश कदम म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्यानंतर कदम यांनी महागाईचा मुद्दा मांडला होता. कदम म्हणाले की, राज्यात महागाई वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. त्यामुळे जनतेसमोर महागाईचं मोठं आव्हान आहे. यासह अनेक प्रश्न आव्हानात्मक बनले आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने जनता उभी राहील. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांचा बहुमताने विजय होईल, असा विश्वास माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा-दिवाळीच्या शुभेच्छा आणि बरच काही…! विधानसभा निवडणूकीसाठी मनसेचा ठाकरे गटाला पाठींबा?
दरम्यान विरोधी महायुती गटातील भाजपच्या विधानसभेत 146 जागा लढत आहे.मात्र या पक्षाला महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा मिळाली नाही आहे. तो जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्ष एकही जागा पक्षाला मिळाली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि यासंबंधी नाराजी काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 5 मतदारसंघ आहेत. ज्यामध्ये गुहागर, रत्नागिरी, दापोली, राजापूर आणि चिपळूण यांचा समावेश होतो. महायुतीमधील जागावाटपात गुहागर, रत्नागिरी , दापोली, राजापूर या जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्या आहेत. तर चिपळूण मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेला आहे. म्हणजे 5 पैकी 4 जागा शिंदे गटाला तर 1 जागा अजित पवार गटाकडे गेली आहे.
हेही वाचा-Assembly Election: ” हिंदू समाजाने ठरवलेलं आहे, महायुतीला विजयी करणार”; नितेश राणे यांचं वक्तव्य
राज्याच्या राजकराणात दिवसेंदिवस वेगवेगळी समीकरणं पाहायला मिळत आहेत. यंदाची ही विधानसभा निवडणूक राजकीय वर्तुळात अतीतटीची लढत असल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांमधील अंतर्गत वाद समोर आले आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर न झालेल्या अनेक सदस्यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आाता राज्य़ात कोणाची सत्ता येणार ? तसंच जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.