Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राज्यसभाही नाकारली

मंत्रिमंडळात संधी डावल्यासंदर्भात माध्यमांनी भुजबळांना सवाल केला असता, भुजबळ यांचा तिळपापड झाल्याचे पाहायला मिळाले. होय मी नाराज अशी तीन शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 17, 2024 | 07:23 AM
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Follow Us
Follow Us:

नागपूर : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर रविवारी (दि.15) नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. यामध्ये 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, जुन्यांचा पत्ता कट झाला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांनाही डावलण्यात आले आहे. त्यामुळे नाराज असलेले भुजबळ आता मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार महायुतीमध्ये कलह निर्माण करणारा ठरला आहे. विशेषतः राज्यातील प्रमुख ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा पत्ता कट केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीतील मोठे बंडखोरीचे कारण ठरण्याची शक्यता आहे, असे संकेत भुजबळ यांनी सोमवारी दिले. ‘मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय, फेकले काय, काय फरक पडतो? मंत्रिपद किती वेळा आले आणि गेले, छगन भुजबळ संपला नाही. जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाले’, अशी संतप्त प्रतिक्रिया नाराजीच्या चर्चावर भुजबळ यांनी दिली.

हेदेखील वाचा : Sangali Politics: सांगली जिल्ह्यात मंत्रिपदाचा दुष्काळ; महायुतीचे पाच आमदार असतानाही पदरी निराशाच

दरम्यान, मंत्रिमंडळात संधी डावल्यासंदर्भात माध्यमांनी भुजबळांना सवाल केला असता, भुजबळ यांचा तिळपापड झाल्याचे पाहायला मिळाले. ‘होय, मी नाराज’, अशी तीन शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली. नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावलले जात असल्याचे भुजबळ म्हणाले.

राज्यसभेबाबत पक्षाकडून मला विचारणा

आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर जा, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते, अशी माहितीदेखील भुजबळ यांनी दिली. मी पूर्वी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होतो. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर आता मी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नसल्याचे मी पक्षाला स्पष्टपणे कळवले आहे. मला माझ्या मतदारांनी निवडून दिले आहे. मग आता मी जर राज्यसभेवर गेलो, तर ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, असा दावा त्यांनी केला.

भुजबळांची नाराजी दूर करण्याचे पक्षाचे प्रयत्न सुरु

पक्षाकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न केले जात आहे. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करून डॅमेज कंट्रोलची तयारी सुरू झाली आहे. भुजबळ यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी हॉटेलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र, त्यानंतरही भुजबळांची नाराजी कायम आहे.

हेदेखील वाचा : Nehru’s Letter : सोनिया गांधींकडील 51 खोक्यांमध्ये नक्की दडलंय तरी काय? नेहरूंच्या खास दस्तऐवजावरून लोकसभेत गदारोळ

Web Title: Chhagan bhujbal may take big decision nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 07:15 AM

Topics:  

  • maharashtra cabinet expansion news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.