• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Why Did Sangli District Not Get A Single Ministerial Post Nras

Sangali Politics: सांगली जिल्ह्यात मंत्रिपदाचा दुष्काळ; महायुतीचे पाच आमदार असतानाही पदरी निराशाच

सांगलीला मंत्रिपद मिळाले नसल्याने पालकमंत्री दुसऱ्यांदा बाहेरचा पालकमंत्री होणार आहे. तर साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई व कोल्हापुरातून हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 16, 2024 | 09:54 PM
Sangali Politics: सांगली जिल्ह्यात मंत्रिपदाचा दुष्काळ;  महायुतीचे पाच आमदार असतानाही पदरी निराशाच

Photo Credit- Social Media सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद का मिळाले नाही

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रवीण शिंदे, सांगली : एकेकाळी राज्याच्या कारभार ज्या जिल्ह्यातून चालायचा, एकावेळी तीन चार मंत्रीपदे असणाऱ्या सांगली जिल्ह्यात महायुतीच्या 3.0  मंत्रिमंडळात एकालाही स्थान मिळाले नाही, त्यामुळे सांगली जिल्ह्याला दुसऱ्यांदा मंत्रिपदाचा  दुष्काळ पडला आहे. सांगली जिल्ह्याने महायुतीला भरभरून दिले, मात्र महायुतीने सांगलीला एकही मंत्रिपद दिले नाही, त्यामुळे जिल्ह्यात नाराजी पसरली आहे.

रविवारी नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला, त्यात सांगलीतून एकही आमदार नव्हता. गेल्या तीन दशकांत दुसऱ्यांदा सांगलीच्या आमदाराशिवाय मंत्रिमंडळ असेल. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठपैकी पाच जागांवर महायुतीचे आमदार निवडून आलेले असतानाही जिल्ह्याला मंत्रिमंडळात डावलण्यात आले आहे. सलग पाचव्यांदा निवडून आलेले सुरेश खाडे यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात होता. पण, त्यांनाही अखेरपर्यंत पक्षश्रेष्ठींचा फोन आला नाही. सांगलीतून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले सुधीर गाडगीळ, खानापुरातून प्रथमच निवडून आलेले एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे सुहास बाबर आणि जतमधून विजयाचा गुलाल उधळलेले गोपीचंद पडळकर आणि सुरेश खाडे अशाचौघांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची अटकळ बांधली जात होती. पण, कोठेतरी माशी शिंकली आणि एकाच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकली नाही.

Maharashtra Politics : शिंदे सरकारमधील डच्चू दिलेले ते १२ मंत्री कोणते?, 4 जण तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते

महायुतीकडून नेहमीच दुजाभाव

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा महायुतीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी देखील सांगलीला दुजाभाव दिला गेला होता, त्यावेळी शेवटच्या टप्प्यात सदाभाऊ खोत यांना कृषिराज्यमंत्री तर सुरेश खाडे यांना कामगार मंत्री पदाची संधी मिळाली, मात्र कमी काळात त्यांना म्हणावं तितकं काम करता आलेच नाही.

धोरणात पुढे असणारा जिल्हा मागे

सांगली जिल्हा हा राजकारणाची पांढरी म्हणून ओळखली जाते, वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पद, आर.आर.पाटील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री, डॉ.पतंगराव कदम यांच्यामाध्यमातून सहकार, परिवहन, वनमंत्री, तर जयंत पाटील यांच्यामाध्यमातून अर्थ, गृह अशी महत्वाची मंत्रीपदे सांगली जिल्ह्यात असल्याची, त्यामुळे राज्याला धोरण देणाऱ्या जिल्ह्यत मंत्रीदाचा दुष्काळ पडला आहे.

Sabhal Mandir update: देवी पार्वतीची खंडित मुर्ती, 500 वर्षे जुनी विहीर; संभलच्या खोदकामात काय काय

दुसऱ्यांदा बाहेरचा पालकमंत्री ..?

सांगलीला मंत्रिपद मिळाले नसल्याने पालकमंत्री दुसऱ्यांदा बाहेरचा पालकमंत्री होणार आहे. साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई व कोल्हापुरातून हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाले आहे. यापैकी एखाद्याकडे सांगलीचे पालकमंत्रिपद सोपविले जाऊ शकते. आयात सांगलीला पुरेसा वेळ देणार का? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. यापूर्वी कोल्हापुरातून चंद्रकांत पाटील, सोलापूरातून सुभाष पाटील मंत्री असताना त्यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्रिपद होते. पण, ते सांगलीला पाहुण्यासारखे कधीतरी यायचे आणि घाईगडबडीत बैठका उरकायचे त्यामुळे आता पुन्हा तेच सांगलीकरांच्या नशिबी येणार आहे.

राजकारणामध्ये आजचा दिवस दुर्दैवी : पाटील

” सांगली जिल्ह्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. महायुती सरकारने २०१४ नंतर पुन्हा एकदा जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असला, तरी मंत्री नसल्याने जिल्ह्याच्या विकासात बाधा येता कामा नये. त्यासाठी काँग्रेस सतत आक्रमक भूमिका घेत राहील. भाजपने जिल्ह्यावर कसला सूड उगवलाय, हे समजण्यापलीकडे आहे.”

Web Title: Why did sangli district not get a single ministerial post nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 09:54 PM

Topics:  

  • maharashtra cabinet expansion
  • sangali

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित

‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित

Jan 05, 2026 | 06:15 AM
टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर

Jan 05, 2026 | 06:05 AM
सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या….! दिवसाची सुरुवात आनंदाने जाण्यासाठी नातेवाईकांना पाठवा ‘या’ गोड शुभेच्छा

सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या….! दिवसाची सुरुवात आनंदाने जाण्यासाठी नातेवाईकांना पाठवा ‘या’ गोड शुभेच्छा

Jan 05, 2026 | 05:30 AM
आता मसालेदार खाणे आरोग्यसाठी फायद्याचे! फक्त कोणते आहेत ते मसाले? जाणून घ्या

आता मसालेदार खाणे आरोग्यसाठी फायद्याचे! फक्त कोणते आहेत ते मसाले? जाणून घ्या

Jan 05, 2026 | 04:20 AM
स्वच्छ शहराचा मुखवटा पडला गळून; इंदूरच्या दुषित पाणी प्रकरणाने वास्तव आले जगासमोर

स्वच्छ शहराचा मुखवटा पडला गळून; इंदूरच्या दुषित पाणी प्रकरणाने वास्तव आले जगासमोर

Jan 05, 2026 | 01:15 AM
CM Devendra Fadnavis यांची ठाकरे बंधूंच्या वचननामावर जोरदार टीका; म्हणाले, “जनाची नाही तर मनाची तरी…”

CM Devendra Fadnavis यांची ठाकरे बंधूंच्या वचननामावर जोरदार टीका; म्हणाले, “जनाची नाही तर मनाची तरी…”

Jan 04, 2026 | 10:38 PM
Maruti Brezza 2026 खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? जाणून घ्या On Road Price

Maruti Brezza 2026 खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? जाणून घ्या On Road Price

Jan 04, 2026 | 09:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM
Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Jan 04, 2026 | 07:42 PM
DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

Jan 04, 2026 | 03:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.