सीएम देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला (फोटो - एक्स)
जेष्ठ गायिका आशा ताई भोसले यांचे निधन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक
लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला – सीएम फडणवीस
CM Fadnavis condoles on Asha Bhosle : मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे बॉलीवुडवर शोककळा पसरली आहे. शनिवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज (दि.12) त्यांची प्राणज्योत मालावली. आशा भोसले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पद्मविभूषण गायिका आशा भोसले यांच्यावर उद्या (दि.13) अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसले यांना शासकीय इतमामात निरोप दिला जाईल. शिवाजी पार्कवर सायंकाळी 4 वाजता आशा ताई भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानंतर बॉलीवुडवर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन भावना व्यक्त केल्या आहेत.
हे देखील वाचा : संगीत विश्वातील सूर हरवला…! सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन
काय आहे देवेंद्र फडणवीसांची पोस्ट?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे की, “तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.
आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांसंगीत विश्वातील सूर हरवला…! सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधनचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली.”
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.
आशाताईंचा आवाज म्हणजे… pic.twitter.com/pAcDLxeXqo — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 12, 2026
‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
हे देखील वाचा : Asha Bhosle फक्त गायिका नाही तर बिझनेसवुमन; दुबई अन् लंडनमध्ये व्यवसाय, तर कोट्यवधींची संपत्ती






