Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke Viral Video: ‘चला, चहा घेऊ…’ म्हणत मुंबई पोलिस दिपकेंना घेऊन गेले; CJP आंदोलनापूर्वीचा मजेशीर VIDEO चर्चेत

Abhijeet Dipke Viral Video: व्हिडीओत अभिजीत दिपके हसत प्रतिक्रिया देत म्हणतात की, "वरून ऑर्डर आली असावी की यांचा फक्त वेळ वाया घालवा, पोलिस ठाण्यात बसवून ठेवा, बाहेर कुठे फिरू देऊ नका. म्हणून आम्हाला चहाच्या नावाखाली डिटेन केलं गेल.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 02, 2026 | 01:25 PM
Mumbai Police Detain Abhijit Dipke Marine Drive Video

Mumbai Police Detain Abhijit Dipke Marine Drive Video

Follow Us
Follow Us:
  • CJP चे संस्थापक अभिजित दीपके यांना मरीन ड्राईव्ह परिसरातून मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
  • महिला पोलीस अधिकाऱ्याने “चला चहा घेऊ” म्हणत ताब्यात घेतल्याचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्क येथे आंदोलनाची घोषणा
Abhijeet Dipke Viral Video: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPकडून मुंबईत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या गेट क्रमांक ६ जवळ सीजेपीने आज (२ ऑक्टोबर) पासून आंदोलन सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असली, तरी आंदोलनावर ठाम असल्याचे CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिपके यांना मरीन ड्राइव्ह परिसरातून पोलिसांच्या गाडीतून पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

‘चला, चहा घेऊ…’ म्हणत महिला पोलिस अधिकाऱ्याची विनंती

गुरुवारी सायंकाळचा हा व्हिडीओ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी अभिजीत दिपके यांना, “चहा घेऊ आपण… चला,” असे म्हणताना दिसतात. त्यावर दिपके, “मॅडम, मला पुढे जायचं आहे. मी चहा आधीच घेतलाय,” असे सांगतात आणि तेथून जाण्याचा प्रयत्न करतात.

पण यात्यानंतरही महिला अधिकारी आग्रहाने, “तुम्ही आमचा शब्द नाही मानणार का? चला… आपण चहा घेऊया” असे म्हणत त्यांना सोबत येण्याची विनंती करतात. त्यावर दिपके पुन्हा, “मॅडम, मी चहा पिला आहे. मला जायचंय. मी गाडी बोलावली आहे,” असे सांगतात.

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घ

महिला अधिकारी पुन्हा त्यांना सोबत येण्यासाठी आग्रह करतात. त्यावेळी दिपके, “डिटेन करायचं असेल तर ऑफिशियली सांगा,” अशी मागणी करताना व्हिडीओमध्ये दिसतात. डिटेन करत नाही, फक्त आमच्यासोबत चहा घ्या असे ते महिला अधिकारी सांगतात.

पोलिसांच्या गाडीतून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात

यानंतर अभिजीत दिपके यांच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना घेऊन पोलिसांच्या गाडीत बसवून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून दिसते. . प्रवासादरम्यान महिला पोलीस अधिकारी दिपकेंना त्यांचे नाव आणि ते कुठे राहतात, अशी माहिती विचारताना दिसतात.

महिला पोलीस अधिकारी : “तुमचं नाव काय?”
अभिजीत दिपके : “अभिजीत दिपके.”
महिला अधिकारी : “तुम्ही कुठे राहता?”
दिपके : “मी संभाजीनगरचा आहे, आता मुंबईत राहतो.”

Cockroach Janta Party Protest: शिवाजी पार्कमध्ये आवाज घुमणार! ज्ञानेश कुमारांविरोधात सीजेपीचे आजपासून ‘जेलभरो’ आंदोलन

यानंतर दिपके आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यातील प्रतीक्षा कक्षात काही काळ थांबवण्यात आल्याचे दिसते. पण पोलिस ठाण्यात काही वेळानंतर संबंधित महिला अधिरारी फोनवर बोलून परत येतात आणि हसत हसत म्हणतात, , “वरून कॉल आलाय… चहा पण नाही पाजायचा, साहेब बोले सरांना जाऊ द्या!” अभिजीत दिपके व मित्र: हे ऐकून सर्वजण हसायला लागतात आणि पोलिस ठाण्यातून बाहेर पडतात.

व्हिडीओत अभिजीत दिपके हसत प्रतिक्रिया देत म्हणतात की, “वरून ऑर्डर आली असावी की यांचा फक्त वेळ वाया घालवा, पोलिस ठाण्यात बसवून ठेवा, बाहेर कुठे फिरू देऊ नका. म्हणून आम्हाला चहाच्या नावाखाली डिटेन केलं गेल. आम्हाला चहासुद्धा पाजला नाही.” पुढे ते मरीन ड्राईव्हकडे परत जाताना म्हणतात, “आता आम्ही मरीन ड्राईव्हला जाऊनच चहा पिणार आणि तेही या पोस्टर्ससोबतच पिणार!” असे म्हणतात. अभिजीत दिपके यांच्या या वक्तव्याने त्यांचे इतर सहकाऱ्यांमध्येही एकच हशा पिकतो. हसत हसतच त्याची टिम पोलिस स्टेशनच्या बाहेर पडते.

त्यानंतर सर्वजण पुन्हा मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघून गेले. पण या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावरही कमेंट्सचा पाऊस पडू लागला आहे. दरम्यान, CJPने आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असून, तरीही आंदोलन करण्याची भूमिका दिपके यांनी घेतली आहे.

 

Web Title: Cockroach janta party abhijeet dipke detained by mumbai police viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 01:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.