Congress state president Nana Patole Target Mahayuti over cabinet expansion portfolio allocation
मुंबई : राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन आता संपले आहे. हिवाळी अधिवेशनावेळी मंत्रिमंडळा विस्तारामधील मंत्र्यांना खाती दिली जातील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आणि खाते वाटपावेळी महायुतीमधील नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. महायुतीमधील अनेक नेते संधी न मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत. यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय टीका करुन महायुतीवर निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी महाभारताचा देखील दाखला दिला. कॉंग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, महायुतीला जनतेच्या प्रश्नांचं किंवा जनतेचं काहीही घेणंदेणं नाही. त्यांच्यामध्ये फक्त मलाईदार जिल्हा आणि मलाईदार खात्यासाठी याची लढाई चालली आहे. आता पालकमंत्रिपदासाठी सुद्धा यांच्यामध्ये भांडण होणार आहे, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, हिंमत असेल तर मारकडवाडीत बॅलेटच्या माध्यमातून या सरकारने मॉकपोलिंग घेतलं पाहिजे. जनतेचं मत चोरून हे सरकार आलं आहे. निवडणूक आयोगाने जे काही नोटिफिकेशन काढलं त्यावरून असं वाटतं दाल मे कूच काला है, असा घणाघात नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. तसेच राहुल गांधी हे माकडवाडी गावाला देखील भेट देणार आहेत. यावरुन भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. या टीकेला नाना पटोले यांनी चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले म्हणाले की, नौटंकी आणि हिटलरशाही या दोन शब्दांचा वापर केला पाहिजे. लोकशाहीत हुकूमशाहीचा वापर केला जात आहे. जनता रस्त्यावर येते तेव्हा कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हे दाखल केले जातात. भाजप हा लोकशाहीवर विश्वास न ठेवणारा पक्ष आहे. आम्ही लोकांवर लाठीचार्ज करून, गोळ्या झाडू आणि त्यांना गुलाम बनवू असं चित्र बावनकुळे यांच्या बोलण्यातून दिसतं असे मत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
कोणाला मिळाली कोणती खाते?
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण व संसदीय कामकाज देण्यात आले आहे. गिरीश महाजन यांच्याकडे लसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ) तर नितेश राणे यांच्याकडे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभाग देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंडे भावंडांकडे देखील महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खाते तर पंकजा मुंडे यांना र्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन ही खाती देण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळांमध्ये भाजप नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.