Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; उपस्थित केला कायदेशीर मुद्दा

सत्ताधारी भाजपने नगरसेवक बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या ‘स’ यादीतील तरतुदीचे वर्गीकरण केले होते. याविषयावरुन राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप या दोन घटक पक्षांत वाद निर्माण झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2026 | 03:34 PM
Pune News : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; उपस्थित केला कायदेशीर मुद्दा

Pune News : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; उपस्थित केला कायदेशीर मुद्दा

Follow Us
Follow Us:

पुणे : नगरसेवकांनी सुचविलेल्या ‘स’ यादीतील कामांविषयी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित करत, सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. महापौर मंजुषा नागपुरे यांनी या विषयावर पुढील बैठकीत चर्चा होईल, असे नमूद करत तूर्तास या विषयावरील वाद टाळला आहे.

सत्ताधारी भाजपने नगरसेवक बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या ‘स’ यादीतील तरतुदीचे वर्गीकरण केले होते. याविषयावरुन राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप या दोन घटक पक्षांत वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या बजेटमधील ‘स’ यादीअंतर्गत होणाऱ्या निधी वाटपाच्या वैधानिकतेवर आणि पारदर्शकतेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंगळवारी मुख्य सभेच्या कामकाजादरम्यान प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महापालिकेत हजारो कोटी रुपयांच्या निधीचे वाटप प्रभागनिहाय ‘अ, ब, क, ड’ असा वर्गवारीचा घाट घालून कोणत्या कायद्यानुसार आणि नियमानुसार केले जात आहे, असा थेट सवाल करत बालवडकर यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले.

‘स’ यादीतील निधी वाटपाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले. “आपण महापालिकेच्या तिजोरीतील एक-एक रुपयाचा हिशोब ठेवतो; परंतु नगरसेवकांच्या प्रभागांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करताना नियमांची पायमल्ली का केली जात आहे? असा प्रश्न बालवडकर यांनी उपस्थित केला. या वेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सत्ताधाऱ्यांकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्याचे टाळण्यात आले. अखेर स्थायी समिती अध्यक्षांनी यावर “प्रशासनच अधिकृत खुलासा करेल,” असे सांगत हात वर केले.

विशेष म्हणजे निधीचे वितरण करणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांनी याबाबत महापालिका आयुक्तांकडे स्पष्टीकरण मागितल्याचे सभागृहापुढे सांगितले. यातून स्थायी समिती अध्यक्षच नियमांबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. मात्र, या महत्त्वाच्या विषयावर खुलासा करण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखापाल सभागृहात उपस्थित नसल्याचे कारण सांगत महापौरांनी या संवेदनशील विषयावर पुढील बैठकीत प्रशासनाने खुलासा करावा, असे निर्देश दिले.

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled : एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

Web Title: Corporator amol balwadkars attempt to corner the ruling bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 03:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.