Cricketer and Trinamool Congress MP Yusuf Pathan rejects all-party delegation
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले. या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तीन दिवस युद्धाची तणावपूर्ण परिस्थिती होती. यानंतर युद्धबंदी करण्यात आली असून भारताच्या केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे. मात्र माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसुफ पठाण यांनी शिष्टमंडळासाठी नकार दिला आहे.
केंद्र सरकारने जगभरातील सर्व देशांमध्ये भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती आणि मोदी सरकारची दहशतवादांबाबत भूमिका मांडण्यासाठी शिष्टमंडळ तयार केले आहे. या शिष्टमंडळामध्ये संसदेच्या सत्ताधारीसह विरोधी खासदारांचा देखील समावेश असणार आहे. या शिष्टमंडळाची यादी तयार झाली आहे. या शिष्टमंडळामध्ये माजी क्रिकेटर आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचे देखील नाव होते. मात्र आता युसूफ पठाण यांनी शिष्टमंडळासोबत परदेशी दौरे करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तृणमूल कॉंग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी शिष्टमंडळामध्ये सामील न होण्याचे थेट केंद्र सरकारकडे सांगितले आहे. ज्या काळामध्ये शिष्टमंडळाचे परदेशी दौरे आहेत त्या काळामध्ये मी उपलब्ध नाही, असे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठान यांनी शिष्टमंडळातून बाहेर जाण्याचे कारण कळवले आहे. मात्र यावरुन भाजप नेत्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. तसेच ही ममता बॅनर्जी यांची भूमिका असल्याचे म्हणत भाजप नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्र सरकारने तृणमूल काँग्रेस पक्षाशी संपर्क न करता थेट त्यांच्या पक्षाचे खासदार युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधला होता. यानंतर खासदार युसुफ पठान यांनी शिष्टमंडळाला नकार कळवल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर, तृणमूल काँग्रेसने परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. परराष्ट्र धोरण हा भारत सरकारचा विषय आहे. यांची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारनेच घेतली पाहिजे, असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या शिष्टमंडळापासून अंतर राखलं आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
परराष्ट्र धोरणाबाबत तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “राष्ट्रहितासाठी, दहशतवादाविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकार जे निर्णय घेईल त्या निर्णयांचं आम्ही समर्थन करून, सरकार जी पावलं उचलेल त्यात आम्ही सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. सरकारने शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय त्या निर्णयावर अथवा सदस्य निवडीवर आमचा आक्षेप नाही. मात्र, आमच्या पक्षातून कोणाला पाठवायचं असेल तर तो निर्णय आमचा पक्ष घेईल. इतर पक्षांच्या लोकांनी असे निर्णय घेऊ नयेत. कुठल्या पक्षाचा कोणता नेता या शिष्टमंडळाबरोबर परदेशात जाणार याचा निर्णय केंद्र सरकारने, भारतीय जनता पार्टीन घेऊ नये ” असे स्पष्ट मत मांडण्यात आले आहे.