विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
सिंधूदुर्ग : सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. येत्या चार महिन्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितल्यामुळे लवकरच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु असून टीका केली जात आहे. सिंधूदुर्गाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदूर्गामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. विनायक राऊत यांनी आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले की, “मी जरी निवडून आलो नाही तरी सातत्याने माझा संपर्क या मतदारसंघात आहे. नितेश राणे यांच्या कोणत्याही आरोपाला सिरियसली घेतलं नाहीये. त्यांना जे मंत्रिपद मिळालं आहे, त्यांची गुरमी आणि मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये भिणली आहे. बिडवलकर प्रकरण असो किंवा सावडाव मारहाण प्रकरण असो या सगळ्या मागे एकनाथ शिंदे गटाचे म्होरके आहेत. निलेश राणे यांचे समर्थक आहेत, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे स्वतः गुंडांना पोसायचं, त्यांला खत पाणी घालायचं आणि इतरांच्या हत्या करायच्या हा जो राणेंचा प्रघात होता तो त्यांच्या दोन्ही मुलांनी चालू ठेवला आहे, हे सिंधुदुर्गाचं दुर्दैव आहे,” अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आम्ही एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करतोय ते त्यांच्या डोळ्यात खूपतय आणि निवडून आलेले खासदार कुठे भूमिगत झाले आहेत असा सवाल सिंधुदुर्गकर, रत्नागिरिकर विचारत आहेत. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत आहेत. तसं तसं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहे. शिंदे गट भाजपला नको आहे, ऍडजेस्टमेंट म्हणून अजित पवार गटाला ठेवतील. भाजपा आणि अजित पवार गट शिंदे गटाचे विसर्जन करतील,” असा गंभीर दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्याबाबत गंभीर दावा केला आहे. ते म्हणाले की, “प्रशासन भ्रष्टाचारी झालेले आहे, संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासकांवरती ज्या धाडी टाकल्या जात आहेत, करोड रुपयांचा घबाड त्यांच्या घरामध्ये मिळत आहे. त्यामुळे सध्याचे शासन आहे ते शासन आणि प्रशासन मिळून लूटमार करत आहेतअख्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त ड्रग्स सप्लाय होत आहे. गोवा बनावट दारू सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. आणि हे सगळं सप्लाय करणारे सगळे भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे या संपूर्ण अवैध धंदे करायचे असतील तर शेकडो रुपये प्रशासनाला द्यावेच लागणार आहेत. त्यामुळे या सगळ्याचा आक्का बोका सर्व राणे कुटुंबीय आहेत,” असा टोला माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.