मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकूडन दबाव वाढला होता. त्यानंतर आज सकाळपासून नाट्यमय घडामोडींनंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचाराजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यांचा राजीनामा पुढील कारवाईसाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आरोपींनी क्रौर्याची सर्व मर्यादा ओलांडल्याने या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजली.
Dhananjay Munde Breaking! मुख्यमंत्री फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बल दीड तास चर्चा झाली. राजीनाम्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला धनंजय मुंडे यांनाही उपस्थित राहण्यास सांगितले होते. यावेळी मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाली, आणि फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की सरकारची प्रतिमा मलीन होत आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले
तपास अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) आणि गुन्हे अन्वेषण विभाग (CID) गठित केले. शनिवारी CID ने या प्रकरणात 1800 पानी आरोपपत्र न्यायालयात सादर केले, ज्यात वाल्मिक कराड हा हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून तो त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन तसेच त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील विविध कार्यभार सांभाळत होता. या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नसल्याचे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती.
Anjali Damania on Dhananjay Munde: बास झालं आता…..! संतोष देशमुखांचे ‘ते’ फोटो व्हायरल झाल्यानंतर
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांच्या पक्षावर सोडला होता, त्यामुळे केवळ चर्चाच रंगत होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. परिणामी, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारावा लागणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.